नांदेड – महेंद्र गायकवाड
केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे दि. 1 सप्टेंबर रोजी आंदोलन करून ‘50 खोके महागाई एकदम ओके’ अशा घोषणा देऊन राज्यातील व केंद्रातील सरकारचा निषेध व्यक्त केला.
भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या महागाईमध्ये जीवन कसे जगावे हे अवघड झाले आहे. सर्वसामान्य व्यक्ती त्रस्त असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ‘50 खोके महागाई एकदम ओके’ असे राजकारण होत असल्यामुळे प्रचंड महागाई वाढली आहे. या सर्व धोरणाच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने प्रचंड निषेध आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.
सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.‘50 खोके महागाई एकदम ओके’, बहुत हो गई महंगाई मार, चलो हटाये मोदी सरकार, मोदी तेरे राजमें कटोरा आया हाथ में, महंगाईने दुखते डोके, गद्दारांना 50 खोके, जनता भरते जीएसटी गद्दार जातात गुहाटी, महागाई कशासाठी आमदाराच्या खरेदीसाठी आदी प्रकारच्या घोषणा देत केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, डॉ. उत्तम सोनकांबळे, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस प्रदेशसरचिटणीस मनबीरसिंघ ग्रंथी, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस प्रदेशसरचिटणीस गजानन कल्याणकर, नारायण येमेवार, रेखा राहिरे, प्रियंका कैवारे, चंद्रकांत टेकाळे, संदीप बोरगावकर, अंबादास जोगदंड, मोहम्मद दानिश, आत्माराम कपाटे,
कैलास पाटील, नागेश बट्टेवाड, ज्ञानेश्वर पाटील शेलगावकर, कैलास पाटील इज्जतगावकर, लक्ष्मण फुलझळके, चक्रधर कळणे, रितेश पवणेकर, पांडूरंग क्षीरसागर, अंकुश पाटील शिखरे, ज्ञानेश्वर डुकरे, रवी पाटील पिंपळगावकर, ओंकार पाटील बोकारे, शिवा भोसले, अंकुश कल्याणकर, संभाजी सुर्यवंशी, गणेश असुळे, दत्ता पाटील ढगे, अविनाश पवळे पळसगावकर, अॅड. बाळासाहेब सोनकांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.