उत्तर प्रदेशातील आग्रा येथून चमत्कारिक बातमी समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. घरातील लोक रडत होते. अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, मग शरीराची हालचाल सुरू झाली आणि त्या व्यक्तीने डोळे उघडले. महेश बघेल असे या व्यक्तीचे नाव आहे. या बातमीची आग्रा शहरात जोरदार चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश बघेल हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रविवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही आणि त्यांचे शरीर पूर्णपणे निर्जीव झाले. अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर घरातील सर्व सदस्य रडू लागले. मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांची गर्दी होऊ लागली.
सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा वर्षाव सुरू झाला
महेश बघेल यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जवळच्या लोकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती. घरात शोकाकुल वातावरण होते. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली, मग महेशने डोळे उघडले आणि श्वास घेऊ लागला. यानंतर, त्याला घाईघाईने उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल यांना शहरातील पुष्पांजली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना त्यांच्या सराई ख्वाजा येथील घरी नेले. पुतण्या मुकेश बघेल यांनी सांगितले की, काकांना घरी आणल्यानंतर तासाभरातच त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि डोळे उघडले. त्याचवेळी, यानंतर त्यांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महेश बघेल जिवंत असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनीही रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबासह भाजप कार्यकर्ते याला देवाचा करिष्मा मानत आहेत. तसेच त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. मात्र, या प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.