रामटेक – राजु कापसे
कोणतही काम करतांना पूर्ण समरपणाने आणि उत्तम केले तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम प्राप्त होतो आणि पूर्ण इमानदारीने केले तर निष्पक्ष निर्णय देऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहित पण करता येते.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना ही राज्य स्तरावरची संघटना आहे जी राष्ट्रीय स्तराशी संलग्न आहे. भंडारबोडी जवळील सालईमेटा स्थित वडील दयाराम बरडे हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांची मुलगी कू. योगिता बरडे यांचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण याच गावातून झाले आहे. पदवीधर शिक्षण हे त्यांनी नंतर नागपूरला घेतले.
लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टी मध्ये अग्रेसर असणे हा त्यांच्या स्वभावाचा आणि कार्य करण्याचा एक भागच जणू बनला आहे. एक महिला म्हणून कुठेच कमीपणा न जाणवू दिलेल्या योगिता यांनी बॉक्सिंग खेळातील पंच म्हणून स्टार 1 परीक्षा या अगोदरच उत्तीर्ण केली आहे.
नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेतर्फे स्टार 2 व 3 या ग्रॅड करीता पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या पंच परीक्षेत स्टार्ट 2 पंच व स्टार 3 चे अपग्रेशन पंच परीक्षा घेण्यात आलेली होती. या पंच परीक्षेमध्ये कुमारी योगिता बरडे ही स्टार 2 पंच परीक्षा उत्तीर्ण झाली.
आता महारष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना याच्या २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेसाठी स्टार 2 पंच साठी झालेल्या परीक्षेत यशस्वी होऊन त्यासाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांचे समाजाच्या, शिक्षणाच्या, खेळाच्या सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. रामटेक तालुक्यासाठी सुद्धा ही गौरवाची बाब आहे.