युवा संवाद व महसूल सप्ताह निमित्य किट्स मध्ये डॉ. हंसा मोहने यांचे प्रतिपादन
रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये युवा संवाद व महसूल सप्ताह निमित्य 4 आगस्टला तहसील कार्यालय रामटेकचा वतीने नवीन मतदार नोंदणी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत केला. या वेळी तहसीलदार डॉ. हंसा मोहने, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश कुलदीवार, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे , विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. पंकज आष्टणकर, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
तहसीलदार डॉ. हंसा मोहने यानी विद्यार्थ्यांसी युवा संवाद साधताना म्हणाल्या की निवडणुक हा लोकशाहिचा मोठा उत्सव आहे. यात सर्व मतदातानी हिरिहिरिने भाग घ्यावा. त्यानी पंचायती राज्य जसे ग्रामपंचायत, पंचायत समिति, जिल्हा परिषद, विधान परिषद, लोकसभा यांचा रचनेची व कार्याची माहिती दिली.
नायब तहसीलदार महेश कुलदीवार मार्गदर्शन पर म्हणाले की ज्यांचे 17 वर्षे वय पूर्ण झाले आहे व जुलै, ऑक्टोबर 2023 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण होतील त्यानी मतदार फार्म नंबर 6 वर नोंदनी करु शकतात. मतदार नोंदनीसाठी व्होटर हेल्पलाईन अँप किंवा ऑफलाईन द्वारे नोंदनी करू शकतात. नोंदनी करीता आधार कार्ड जरूरी आहे. 7 नंबर फार्म मध्ये नाव वगळने व 8 नंबर फार्म मध्ये नावात बदल करू शकता.
प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे मार्गदर्शन पर म्हणाले की 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी व मतदाता कार्ड तयार करावे. निवडनुक विभागाचे जय झोडापे, पवन जगताप यानी नवीन मतदारा करिता फॉर्म वाटप फार्म केले. डॉ. पंकज आष्टणकर यांनी प्रस्तावना, सेजल चौरसिया यानी संचालन व सागर जीवने यानी आभार प्रदर्शन केले.