पातूर – निशांत गवई
वनपरिक्षेत्र अधिकारी पातुर यांना बेलतळा शिवारात हरणाचे मास शिजवून खाण्याची घटना गुप्त माहिती वन विभागाला मिळाल्या वरून पातुर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या चमूने बेलतळा शिवार येथील एका शेतात धाड टाकली असता वन विभागाची गाडी पाहून तेथील आरोपींनी पड काढला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिपातीने आरोपींचा पाठलाग केला असता एकूण चार आरोपीला पकडण्यातकर्मचाऱ्यांना यश आले बाकी आरोपी फरार झाले.
मुख्य आरोपी लहू शिवराम चव्हाण याच्या घराच्या झडतीमध्ये वन विभागाला काळवीट त्याचे सिंग 1 नग लोखंडी सुरी 3 नग लोखंडी कोयता एक नग व पिंजऱ्यामध्ये जिवंत दोन तीतर इतका मुद्देमालआढळून आल्याने तो जप्त करण्याची कारवाई व आरोपी विरुद्ध वन गुन्हा क्रमांक 01587/6 31.07.2023 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये पिंटू उर्फ लहू शिवराम चव्हाण गोविंदा मारू राठोड बोधीराम कामा राठोड राहणार बेलतळा येथील रहिवासी आहेत तसेच पुढील तपास श्री कुलस्वामी एस.आर.वन विभाग अकोला श्री सु .अ वडोदे सहाय्यक वनरक्षक विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.