अहेरी – मिलिंद खोंड
लॉंयड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेड तर्फे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बस सेवेची सुरुवात सोमवारी लगाम येथून करण्यात आली. ही सेवा लगाम ते आलापल्ली अशी असणार असून या बस सेवेचा लाभ परिसरातील लगाम ,बोरी, खमनचेरू, सुभाषनगर,महागाव, कनेपल्ली,आप्पापल्ली आदी. गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना आलापल्ली येण्यासाठी सोईचे होणार आहे.
परीसरातील विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दुर्दशे मुळे व एस.टी महामंडळाच्या बससेवेच्या अनियमित वेळेमुळे अनेकदा शाळा चुकवावी लागत होती. आता लॉंयड्स मेटल्स कंपनी तर्फे सकाळी 8 वाजता बससेवा सुरू झाल्याने अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
यावेळी बससेवेच्या उद्घाटन प्रसंगी लॉंयड्स मेटल्स कंपनी चे विनोद कुमार, भाजपा महामंत्री रवींद्र ओल्लालवार,लगाम चे सरपंच दीपक आत्राम,बोरी चे सरपंच मधुकर वेलादी,लिंगा दुर्गे, सुरेश गंगाधरीवार,ऋषी पोर्टेत,गोविंद विश्वास, अजय ,राहुल,डॉ.सलूजा आदी सह नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.