Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | एम.डी. पावडरच्या गुन्हातील आणखी एका आरोपीला मुंबई येथून अटक...गुन्हे शाखेची...

अमरावती | एम.डी. पावडरच्या गुन्हातील आणखी एका आरोपीला मुंबई येथून अटक…गुन्हे शाखेची १ कारवाई…

कवल पांडे, क्राईम रिपोर्टर

अमरावती | शहरात एमडी पावडरची खेप आणणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर आणखी एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात अमरावती गुन्हे शाखा क्र. १ ला यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनीषकुमार रमेश बोरीचा असे नाव असून तो मुंबईतील 64/6 लालचाल बाळूचांगू पाटील मार्ग उमरखाडी डोगरी भागात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशाप्रकारे आहे की, यातील नमुद घटना तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीला गुप्त बातमीदारकडून माहीती प्राप्त झाली कि इसम नामे सुरज शिवकुमार तिवारी वय 33 वर्ष रा. चिचफैल अमरावती ज्याने अंगात हिरव्या रंगाचे हाफबाहयांचा टी शर्ट आणि काळया रंगाचा कार्गो फुलपेंट घातलेला असुन तो त्यांच्या पेंटच्या डाव्या खिशामध्ये एम डी नावाच्या अंमली पदार्थाचे पाउच बाळगुन बडनेरा येथून अमरावती येथे एमडी पावडर ची विक्री करीता येत आहे.

सदर माहीतीचे अनुषंगाने एन.डी.पी.एस कायदयातील तरतूदीचे पालन करून फिर्यादीने मा. सहायक पोलीस आयुक्त फेजरपूरा विभाग यांची रितसर परवानगी घेवून पंच व पोलीस स्टाफच्या मदतीने सदर ठिकाणी सापळा
रचून रेड कार्यवाही केली असता आरोपी शिवकुमार तिवारी याचे ताब्यातून 34.27 ग्रॅम वजनाचे पांढ-या रंगाचे रवेदार एम. डी. पावडर अमली पदार्थ कि.अ 3,40,000 रू घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आले व आरोपीला सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदर माल 1) आदेश पंचारीया रा सातखीराडी अमरावती 2) पंकज ऊगले 3) धिरज भुयार दोन्ही रा किशोर नगर अमरावती यांचा असून त्याला मुंबई येथून अमरावती येथे खेप आणण्यासाठी प्रती खेप 8000 रू दिले जाते व तो त्याने मुंबई येथुन मेहमुद नावाचे इसम रा भिवंडी कल्याण यांचे कडून आणला असल्याचे सांगीतले. वरिल सर्व आरोपीविरूध्द फिर्यादीचे रिपोर्टवरून सदरचा गुन्हा क्र. 454 / 23 कलम 8 (क). 22 (ब). 29 गुंगीकारक औशधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे दाखल करून तपासात घेतला.

सदर गुन्हात आरोपी सुरज तिवारी याला दिनांक 25/07/2023 रोजी अटक करण्यात आली होती तो मा. न्यायालयाचे आदेशाने दिनांक 30/07/2023 पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये होता. त्यादरम्याण त्याचेकडे तपास केला असता त्याने तो माल प्रथम मेहमूद यांचे कडून आणल्याचे सांगीतले होते परंतू त्याला विश्वासात घेवून त्याचे कडे तपास केला असता मुंबई येथील मनीषकुमार रमेश बोरीचा रा 64/6 लालचाल बाळूचांगू पाटील मार्ग उमरखाडी डोगरी मुंबई याचा सदर गुन्हात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याला पोलीस स्टेशन डोंगरी येथील पोलीसांचे मदतीने अत्यंत गजबजलेल्या व सर्वेदनीशील समजल्या जाणा-या भागातून अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून अमरावती येथे आणून सदर गुन्हात अटक करण्यात आली असूनसध्या तो पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून त्याचे कडे गुन्हा संदर्भाने तपास सुरू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, नवीनचंद्र रेडडी मा. पोलीस उपआयुक्त, सागर पाटील (मुख्यालय), सहायक पोलीस आयुक्त (डिटेक्शन) प्रशात राजे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसारात चोरमले, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजू आपा, पोहवा फिरोज, पोहवा देशमूख, नापोका नांदे, पोलीस अमलदार निखील गेडाम, सुरज चव्हान, विकास गुडदे, निवृती काकड, चालक भूषन पदमने, अमोल बहादरपूरे या टिमने केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: