Thursday, October 31, 2024
Homeराज्यतक्षशिला महाविद्यालयात 'फिल्म अँण्ड डॉक्युमेंटरी' अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात...

तक्षशिला महाविद्यालयात ‘फिल्म अँण्ड डॉक्युमेंटरी’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात…

  • चित्रपट, नाटय, फोटोग्राफी, व्हीडीओ क्षेत्रात करिअर करण्याची संधी .
  • अमरावती शहरात प्रथमत: चित्रपट क्षेत्रात मास्टर डीग्री घेण्याची संधी.
  • कोणत्याही शाखेतील पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम.

अमरावती – श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयात ‘पीजी इन डॉक्यूमेंटरी अँण्ड फील्म मेकींग’ या दोन वर्षीय अभ्यासक्रमासाठी (मास्टर डीग्री) प्रवेशास सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारक विद्यार्थी  प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमानंतर स्पर्धा परीक्षा, सोशल मीडिया,  डीटीपी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, रेडिओ, टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया, नाट्यक्षेत्र, चित्रपटामध्ये करिअर करू शकतात.     

‘पीजी इन डॉक्युमेंटरी अँण्ड फील्म मेकींग’ हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत प्रथमत: तक्षशिला महाविद्यालयात राबविला जात आहे. हा अभ्यासक्रम अत्यल्प कमी फीमध्ये उपलब्ध असून पदवीधारक विद्यार्थी यात प्रवेश घेऊ शकतात. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळते. तक्षशिला महाविद्यालय नॅक पुनर्मुल्यांकन (बी+) श्रेणी प्राप्त असून श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट ही  महाराष्ट्र शासनातर्फे धार्मिक (बौद्ध) अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था आहे.  

‘पीजी इन डॉक्युमेंटरी अँण्ड फील्म मेकींग’ हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अद्यावत संगणक लॅब, स्टुडीओ,  विभागीय लायब्ररी, नाममात्र शुल्कात वाई-फाय, स्पर्धा-परीक्षा अभ्यासिका उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी व्हाट्स अप तसेच कॉलसाठी ९९२२६२९८४५ संपर्क करावा असे आवाहन तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी सर्व स्पर्धा परिक्षा, चित्रपट, जाहीरात, नाटय, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म, म्यूझिक क्रियेशन, डीटीपी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, रेडिओ, टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया इत्यादी क्षेत्रात करिअर करू शकतात. या अभ्यासक्रमात ड्रामा मेकींग, स्क्रीन प्ले, स्क्रीप्ट रायटींग, एडीटींग, लायटींग, साऊंड इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव आहे.

पत्रकारिता विभागात फक्त दहा जागा शिल्लक – तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागात बी.ए. (जर्नालिसम अँड मास कम्युनिकेशन) या तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी फक्त दहाच जागा शिल्लक आहे. या तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील १२ वी पास विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी व्हाट्स अप तसेच कॉलसाठी ९९२२६२९८४५ संपर्क करावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: