Saturday, September 21, 2024
HomeBreaking Newsबुलढाणा | दोन खाजगी बसेसची समोरासमोर धडक...५ प्रवासी ठार तर २० ते...

बुलढाणा | दोन खाजगी बसेसची समोरासमोर धडक…५ प्रवासी ठार तर २० ते २५ जण जखमी…

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक ६ वर दोन खाजगी बसेसचा समोरासमोर धडक झाली, या भीषण अपघातात ठार, तर 20 ते 25 जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघात आज दिनांक 29 जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उडान पुलावरती झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स तीर्थयात्रा करून अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती या ट्रॅव्हल्स मध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते 20 ते 25 प्रवासी जखमी आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहर पो.नी. अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक यांच्या अधिकारी व कर्मचारी सहित घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: