पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील खेट्री येथील लोकप्रिय सरपंच जाहूर खान यांची अखिल भारतीय सरपंच परिषदचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील विदर्भ अध्यक्ष देवा पाच भाई राज्य सल्लागार राजेंद्र कराळे तसेच जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद अकोला जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने पातूर तालुका अध्यक्षपदी जहुर खान यांची निवड करण्यात आली जहुर खान यांनी गावाचा सरपंच पदाचा कारभार हातात घेताच गावाच्या विकास कामाला गती प्रधान झाली आहे.
त्यामुळे सरपंच यांनी आपल्या कामामुळे नावाचा ठसा तालुक्यावर आहे इतर परिसरातील सरपंच च्या विकास कामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरपंच जहुर खान हे अविरत धडपडत असतात गावातील विकास काम करण्या वेळी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या परिसरामध्ये विकास कामात विघ्न संतोषी लोकांकडून अडचणी निर्माण होतात व खोट्या तक्रारीचा सरपंचांना सामना करावा लागत असतो त्यामुळे ग्रामीण भागातील विकास काम रेंगाळत असतात अशा खोट्या तक्रारी झाल्यास तर संघटनेच्या माध्यमातून निवारण करता येईल शिवाय सरपंच यांनी ग्रामीण भागामध्ये विकास कामावर भर देऊन शासनाकडून आलेल्या निधीचा दूर उपयोग न करता विकास कामावर खर्च केला पाहिजे,
तसेच ग्रामस्थांना आरोग्य स्वच्छ पाणी सुंदर परिसर आणि वृक्षरोपण या विषयावर अधिक भर दिला पाहिजे तालुक्यातील सर्व सरपंच यांना संघटनेच्या माध्यमातून विकास कामात होणाऱ्या तक्रारीचे निवारण करता येईल परंतु तालुक्यातील कोणत्याच सरपंचांनी शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून खाजगी मतेदारी दाखवू नये अशा सरपंचांना संघटनेच्या माध्यमातून पाठीशी घालण्यात येणार नाही असे विनंतीपूर्वक पातुर तालुका अखिल भारतीय संघटनेचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष तथा खेत्री येथील सरपंच जहुर खान यांनी बोलता वेळी सांगितले.