Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीवनविभागातील गोंवशाच्या निलामी वरून बजरंग दल आक्रमक...उप वनसंरक्षकाना निवेदन…न्यायालयातही दाद मागणार….

वनविभागातील गोंवशाच्या निलामी वरून बजरंग दल आक्रमक…उप वनसंरक्षकाना निवेदन…न्यायालयातही दाद मागणार….

आकोट- संजय आठवले

आकोट वनविभागाने ताब्यात घेतलेल्या ५४ गोवंशांना हटवादीपणाने वनविभाग कार्यालय परिसरात उपाशी ठेवून व नंतर नीलामी बाबतचे नियम डावलून या गोवंशांची नीलामी केल्याने बजरंग दल कमालीचा आक्रमक झाला आहे. वनविभागाच्या या गैर कृत्याबाबत आकोट उपवनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले असून यासंदर्भात न्यायालयातही दाद मागण्यात येणार आहे.

आर. एफ. ओ. लोखंडे यांनी गोंवशाची तस्करी करणाऱ्या गोंतस्कराच्या तावडीतून ५४ गोंवशाना जप्त केले. त्यांना पोपटखेड मार्गावरील वन्यजीव वनविभागाचा कार्यालयात ठेवण्यात आले. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून विना अटी व शर्तीसह आकोट गोरक्षण सेवा समितीच्या वतीने अर्ज देऊन या गोवंशांची मागणी करण्यात आली. मात्र असे न करता वन्यजीव वन विभागाने या गोवंशांना कार्यालय परिसरात ठेवले.

मात्र त्यांची कोणतीही काळजी न घेतल्याने मागील २० ते २५ दिवसांपासुन या गोंवशांची उपासमार झाली.यातील काही गोंवशाचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. त्यानंतर वनविभागाने निवीदा काढून गोंवंश लिलावाची जाहीर नोटीसही काढली. तसेच गुपचूपपणे लिलावही उरकून घेतला. असे करताना या संदर्भातील अटी शर्ती व नियमांचे वनविभागाने जराही पालन केले नाही. याबाबत माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल‌ आकोट गोरक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गोंवश लिलावावर आक्षेप घेतला. सदर लिलाव हा बेकायदेशीर असल्याचे लेखी निवेदन वन्यजीव वनविभागचे उप वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी गोरक्षक व वन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत उप वनसंरक्षकएन.जयकुमारन यांनी गोंरक्षकांच्या मागण्या मान्य केल्या. गोहत्याबंदी कायद्यान्वये खरेदीदाराकडुन हम्मी पत्र, ॲनिमल टॅग करून, तसेच दर तीन महिन्याला गोवंश जिवंत असल्याची खात्री करण्यात येणार असल्याची हमी त्यांनी दिली.

यावेळी अनिल आप्पा गोडागरे,
शिवा टेमझरे, दिलीप बोचे, विजय चंदन, सारंग कराळे, हर्षल अस्वार, मनिष‌ इटनारे, ज्ञानेश्वर दुधे, राजेश चंदन, प्रविण डिक्कर, मयूर नाठे, ऋषी बेराड, राजु ढोले, बजरंग मिसळे, शुभम च़ंदन‌, तथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आकोट गोरक्षण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: