नांदेड – महेंद्र गायकवाड
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी अनाधिकृत होर्डिग्ज लागु नये तसेच अनाधिकृत होर्डिग्जना निर्बंध घालण्यासाठी व बॅनरच्या बाबतीत नियम पाळण्यासाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई जनहित याचिका क्र. 155/2011 ची अमंबजावणी करण्यासाठी आयुक्त यांनी अनाधिकृत जाहिरात बॅनर लागल्यास संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिका-यांना दिल्या होत्या.
आज दि.25 जुलै रोजी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा फरतुल्लाह बैग व मालमत्ता व्यवस्थापक अजीतपालसिंघ संधु यांच्या नियंत्रणात क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 अशोकनगर अंतर्गत हनुमानगड कमानी समोर शिवकुमार हिरेमठ हिरेमठ डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स यांनी सार्वजनिक संपत्तीचे ठिकाणी 10 बाय 15 फुट आकाराचे महानगरपालीकेची परवानगी न घेता अनाधिकृत जाहिरात फलक लावण्याचे दिसुन आल्याने त्यांच्या विरोधात सार्वजनिक संपत्तीस नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 कलम 3 व महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायदा 1995 कलम 3 नुसार क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 चे जाहिरात निरीक्षक वसंत कल्याणकर यांनी विमानतळ पोलिस स्थानकात संबंधिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच महापालिकेची रितसर परवानगी घेऊनच जाहिरात फलक लावावेत अन्यथा नियमाप्रमाणे पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात येतील असे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी कळविले आहे.