सांगली – ज्योती मोरे.
बेडग मधील सरपंचांसह उपसरपंचांवर गावातील बेकायदेशीर कमान पाडल्याच्या प्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बेडग सह जिल्ह्यातील चाळीस गावातील लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, सदर कमानी वरून ज्यांनी राजकारण करून मंत्रालयावर लॉंग मार्च काढला आणि प्रशासनावर ॲट्रॉसिटी दाखल करायला भाग पाडले,त्यांच्यावरही कमान अधिकृत की अनाधिकृत याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.