रामटेक – राजु कापसे
रामटेकच्या अंबाळा तिर्यक्षेत्रातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अंबाळाचे मुख्य प्रवेशद्वार ते लक्ष्मीनारायण मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिर ते कुनबी समाज धर्मशाळा पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सम्पूर्ण रस्ता चिखलाने माखलेला आहे. पर्यटक व गावातील लोकांनी कसे जायचे. रस्ता चिखलाचा झाल्याने अनेक अपघात होऊन लोक ज़ख्मी झाले.
रामटेक तीर्थ विकास आराखडा अंतर्गत मागील काही महिन्यात मुख्य मार्ग वर सिवरेज लाईनचे काम केले गेले. सांडपानी करिता नाली तयार केली, नंतर पिण्याचा पाण्याची पाइप लाईन टाकल्या गेली।असे काम त्याच रोडवर तीन वेळा करण्यात आले. अजून पर्यंत काम चालू आहे. डामर रोड खोदून सीमेंट पाईप टाकले . परंतू तेथे अजून पर्यंत डामरीकरण केले नाही.
तिन्ही कामे वेगवेगळ्या ठेकेदारने केले. डामर रोड वर मातीचे ढिगारे लावले. परंतु एकाही ठेकेदारने रोड़वरिल माती अजून पूर्णपने काढलेली नाही. रोडवरचे गड्ढे बुजवले नाहीत. ठेकेदाराने व्यवस्थित काम न केल्याने लोकाना वाहतुकीचा त्रास होत आहे.
काही ठिकाणी जास्तच गड्ढे रोड वर पडले आहेत पानी जमा होऊन चिखल झाला. येथे मोठ्या संखेत विदर्भ व भारतातील पर्यटक अंबाळा दर्शन व दशक्रिया करिता येतात. पर्यटक सीताराम दास महाराज खाक चौक मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, तेली समाज धर्मशाळा, कुणबी समाज धर्मशाळा, सहीत अनेक मठ मधे जातात, परंतू रोड अत्यंत खराब झाल्याने लोकाना त्रास होतो.
येथे अनके मठ, धर्मशाला व मंदिर आहेत. खाक चौक येथे मंदिरात येणारे रमेश चौकसे, राजाराम देशमुख, सुरेश दुबे, गजानन गुंडुकवार, गजानन इखार, राजू इखार, भुजाडे महाराज, पुरुषोतम चोपकर तसेच गावांतील नागरीक विजय पांडे, गोटू महाराज, किरण मटकर सहित आदिनी मांगनि केली आहे की खराब रोड तूरंत दुरुस्त करावा.