न्यूज डेस्क – पुणे शहराच्या बाणेर येथून धक्कादायक घटना समोर आलीय, अमरावतीच्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नोती मिळाली होती. या घटनेपूर्वी ते पुण्यातील त्यांच्या घरी आले होते. त्याने रात्री उशिरा पत्नी आणि पुतण्यावर अचानक गोळ्या झाडल्या. आधी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
चतु:श्रृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील एसीपी भरत गायकवाड यांच्या ५७ वर्षीय घरात सोमवारी पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी पहाटे 3.30 च्या सुमारास एसीपीने प्रथम पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर गोळीचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पुतण्या धावत आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. त्यांनी दरवाजा उघडताच एसीपीने त्यांच्या पुतण्यावर गोळीबार केला, त्यानंतर गायकवाड यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. यादरम्यान तिघांचा जागीच मृत्यू झाला.
भरत गायकवाड (वय ५७) यांना नुकतचे वरिष्ठ पोलीस निरक्षकपदावरुन एसीपी म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली होती. ते अमरावतीच्या राजापेठ येथील कार्यरत होते. त्यांचे कुटुंब पुण्यात राहत होते. ते अमरावतीवरुन सुट्टी घेऊन पुण्यात आले होते. सोमवारी पहाटे चार वाजता त्यांनी पत्नी मोनी हिला गोळी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकून पुतण्या दीपक धावत आला. त्यानंतर त्यालाही गोळी मारली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.
भरत गायकवाड यांनी अगोदर पत्नी मोनी गायकवाडवर (44) गोळी झाडली. त्यापूर्वी त्यांनी त्यांची आई आणि मुलगा सुहास यांना खोलीतून बाहेर काढले होते. परंतु गोळीबाराचा आवाज ऐकून आलेल्या पुतण्यावरही गोळीबार. या घटनेची माहिती सुहास गायकवाड याने पोलिसांना दिली. त्यानंतर तिघांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. खून आणि त्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.