अहेरी – मिलिंद खोंड
मणिपुर राज्यात घड़लेल्या महिला अत्याचार विरोधात आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट व काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार 23 जुलै रोजी आलापल्ली येथील मुख्य, वीर बाबूराव शेडमाके चौकात निषेध व निदर्शन आंदोलन करण्यात आले.
यावेळी किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर महिला आंदोलकांनी चप्पल व जोड़े मारून कठोर कारवाईची मागणी केले तसेच मणिपुर राज्यात महिलांची नग्न धींड काढून महिलांवर राजरोसपने अन्याय-अत्याचार करण्यात येत असल्याने देशात सुरक्षितता न राहिल्याने मोदी व भाजपा सरकारवर सड़कुन टीका करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी, मणिपुरची घटना मानवतेला व स्त्री जातीला काळीमा फासणारी असून देशासाठी घृणा व लांच्छनास्पद प्रकार व निषेध करायला शब्दही अपूरे पडणारे असून मोदी ‘मन की बात’ पेक्षा ‘जन की हाल’ लक्षात घ्यावे असे म्हणत भाजपा व मोदी सरकारवर सड़कुन टिका करून किरीट सोमय्या यांच्यावर तात्काळ कठोर शिक्षा करण्याची तीव्र व एकमुखी मागणी केले आणि या विरोधात अहेरी उप जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने, निषेध, आंदोलनाची मालिका राबवून लवकरच मोठ्या स्वरुपात जनाक्रोश मोर्चा काढण्याचा ईशाराही रियाज शेख यांनी यावेळी दिले.
तसेच यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष डॉ.निसार हकीम, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख धर्मा रॉय, अक्षय पुंगाटी यांनीही भाजपा व मोदी सरकारचे खरपुस समाचार घेऊन भाजपाचे किरीट सोमय्या यांना क्लीन चिट देण्याचे मनसूबे दिसत असल्याने भाजपा हे देशात हुक़ूमशाही व हिटलरशाही करीत असल्याने येत्या 2024 ला जनता नक्कीच धड़ा शिकविनार असल्याचे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉरेन व विदेश फिरण्यापेक्षा एकदा मणिपुर येथे जाऊन यावे असा एकसुर काढले.
यावेळी आंदोलनात अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, शिवसेनेचे जिल्हा संघटक विलास ठोंबरे, अहेरी प्रभारी तालुका प्रमुख सुनील वासनिक, शिवसेनेचे नगरसेविका तथा बांधकाम सभापती नोरास शेख, नगरसेविका ज्योती सडमेक, युवा प्रमुख दिलीप सुरपाम, अयान पठाण, महेश मोहुर्ले, राहुल दुर्गे, महिला आघाडीचे तूळजा तलांडे, एटापल्ली तालुका प्रमुख मनीष दुर्गे, महिला आघाडीचे रमा करपेत, शालिनी नैताम,अरुणा निकोले, मुलचेराचे नीलकमल मंडल, काँग्रेस पक्षाचे किसान आघाडीचे नामदेव आत्राम, बबलू सडमेक, रज्जाक पठाण, अज्जू पठाण, हनीफ भाई, राघोबा गौरकार, गणेश उपल्पवार, अजय सडमेक , व्येकटेश आत्राम, आदि पदाधिकारी , शिवसैनिक व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.