रामटेक – राजु कापसे
प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने 9 वर्ष यशस्वी पूर्ण केले. 9 वर्षात केंद्र सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबविल्या. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून गरीब व सामन्याच्या हिताच्या योजना राबविल्या त्याबद्दल रामटेक शहर भाजपच्या वतीने माजी आमदार डी मल्लिकार्जुनजी रेड्डी यांच्या नेतृत्वात घरो घरी जाऊन घर चलो अभियान राबविण्यात आले व शासकीय योजनांची जनतेला माहिती दिली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले,माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख,आलोक मानकर,उमेश रणदिवे, करीम मालाधारी, अनुप राजूरकर, पद्माताई ठेंगरे, शिल्पा रणदिवे,विनायक बांते, आनंदराव चोपकर, चंद्रशेखर माकडे,सरदार शेख, बंसिजी काठोके उपस्थित होते.