Friday, July 19, 2024
spot_img
Homeराज्यप्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित राहिलेल्या पातुर शहरातील नागरिकांना अकोल्याचे लाडके खासदार...

प्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित राहिलेल्या पातुर शहरातील नागरिकांना अकोल्याचे लाडके खासदार संजय धोत्रे व कर्तव्यदक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या विशेष प्रयत्नाने मिळणार घरकुलाचा लाभ…

पातुर – निशांत गवई

पातुर शहरातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणे करिता नगरपरिषद पातुर मध्ये 2018 मध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यामध्ये एकूण 655 अर्ज आले होते त्यानुसार 30 जानेवारी 2019 रोजी csmc च्या मीटिंगमध्ये DPR मंजूर करण्यात आला असून सन 2019 चे लक्षांक हे 232 घरकुलांचे होते परंतु 232 घरकुल पैकी फक्त 83 घरांचा DPR मंजूर झाला होता तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा दुसरा DPR मंजूर झालेला नाही त्यामुळे सन 2018 मध्ये अर्ज सादर केलेल्या 655 लोकांनी 2018 मध्ये अर्ज करून सुद्धा त्यांना आज पर्यंत ही लाभ मिळाला नाही आणि तेव्हापासून आजपर्यंत नवीन अर्ज घेणे सुद्धा बंद झालेले होते.

त्यामुळे बरेचसे गरीब नागरिक या योजनेपासून वंचित राहत आहेत म्हणून दुसरा DPR लवकरात लवकर तयार करण्यात यावा आणि नवीन अर्ज स्वीकारण्यात यावे ही बाब भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार आदरणीय श्री रणधीर भाऊ सावरकर यांना पातूर येथील भाजपा कार्यकर्ते यांनी सांगितले त्यावेळेस ताबडतोब विकास पुरुष तरुण तडफदार कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्री रणधीर भाऊ सावरकर यांनी दुसरा DPR तयार करण्याकरिता पातुर नगर परिषद चे प्रभारी मुख्याधिकारी सय्यद ऐसानोदिन व नगरपरिषद चे संबंधित कर्मचारी तसेच PMC चे विशाल तडस तसेच TLC चे राहुल अत्तर कार यांना त्वरित अकोला येथे बोलवून सविस्तर माहिती समजून घेऊन त्वरित खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय संजयजी धोत्रे साहेब यांच्या सोबत चर्चा करून माननीय मुख्य अभियंता..

2 प्रधानमंत्री आवास योजना कक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रिय विकास प्राधिकरण कलानगर बांद्रा पूर्व मुंबई 400051 यांना पत्र पाठवून त्वरित अर्ज घेण्यासंबंधी सूचना केल्या त्याचप्रमाणे PMC च्या संबंधित कंत्राटदार यांना दुसरा DPR एक महिन्यांमध्ये सादर करण्याकरिता सूचना केली दुसरा DPR तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून घरकुल साठी पातुर शहरातील नागरिकांचे नवीन अर्ज लवकरात लवकर घेण्यात यावे असे मुख्य अभियंता दोन प्रधानमंत्री आवास योजना कक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रीय विकास प्राधिकरण कलानगर बांद्रा पूर्व मुंबई 400051 यांचे पत्र पातुर नगरपरिषद ला आज दिनांक 19/07/2023 ला प्राप्त झाले.

त्याबद्दल समस्त पातुर शहरातील कार्यकर्ते, घरकुल लाभार्थी तसेच पातुर शहरातील नागरिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.त्यांनी खासदार संजयजी धोत्रे साहेब तसेच भाजपा प्रदेश सरचिटणीस विकास पुरुष कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्री रणधीर भाऊ सावरकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: