Friday, September 20, 2024
Homeराज्यनांदेड | अनुकंपा धारकांची सामायिक जेष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द...

नांदेड | अनुकंपा धारकांची सामायिक जेष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर 22 ऑगस्ट 2005 ते 30 एप्रिल 2023 पर्यतची वर्ग-3 व वर्ग-4 अनुकंपाधारकांची अंतीम सामायिक जेष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://nanded.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिध्द करण्यात आलेली यादी सर्व अनुकंपा नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी संकेतस्थळावरुन प्राप्त करुन सर्व संबंधिताच्या निदर्शनास आणून द्यावी.

शासन निर्णयात नमूद तरतुदी, निकषाचे काटेकोर पालन करुन अनुकंपा प्रतिक्षासुची, नियुक्ती बाबतची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. अनुकंपा नियुक्ती बाबतची कार्यवाही नियमानुसार विहित वेळेत करण्याची दक्षता अनुकंपा नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी घ्यावी.

तसेच ज्या कार्यालयाच्या बाबतीत नियुक्ती प्राधिकारी हे विभाग स्तरावर किंवा राज्यस्तरावर आहेत अशा संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्यास्तरावरील संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्दशनास आणून द्यावी असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: