अमरावती ग्रामिण जिल्हयात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाही या बाबीकडे विशेष लक्ष केन्द्री करून असा प्रकार आढळून आल्यास त्यावर त्वरीत प्रभावी कार्यवाही करण्याबाबत मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी आपले अधिनस्थ सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी तसेच स्था. गु. शा. पथकास आदेशित केलेले आहे.
दि.१८/७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. मोशी हद्दीत गुन्हेगार शोध करित असतांना गोपनिय माहीती मिळाली की, ग्राम पाळा शिवारात काही इमस ५२ पत्यांचे हार जितवर जुगार खेळ खेळीत आहेत.
प्राप्त माहीतीची शहानिशा करून पथकाने त्वरीत घटनास्थळी सापळा रचुन जुगार रेड केला असता आरोपी नामे १) अमित महेन्द्रप्रसाद यादव, रा. नांदगांव पेठ २) सार्थक विजय आमझरे, रा. मोशी ३) अंकुश भिमराव बोरवार, रा. रामकृष्ण कॉलनी, बेनोडा ४) मंगेश गिरीधर हीमाने, रा. भवानी चौक, तिवसा ५) मनोज संजय भुसाटे, रा. गिट्टी खदान, मोशी
६) शे. अमीन शे. अहमद, रा. कडबी बाजार, अमरावती ७) जुबेर अहमद अ.हमीद, रा. पेठपुरा मोर्शी ८) योगेशश्वर शत्र गणेश्वर, रा. श्रीकृष्णपेठ, मोर्शी ९) गौरव नागेश अग्रवाल, रा. कांडली परतवाडा १०) ऋषिकेश अरूणराव पा. रा. सवईपुरा, अचलपुर ११) सुरेश टेकचंद नेमाणी, रा. कृष्णानगर, अमरावती १२) मोहन निपाणे, रा. मोर्शी (फरार) १३) संदीप ऊर्फ टिल्या जहकार, रा. मोर्शी हे ५२ पत्यांवर पैश्याचे हार-जीतचा जुगार खेळ खेळीत असतांना मिळुन आले.
सदर आरोपीतांचे ताब्यातून नगदी ४,४५, १८०/- रू , ०९ मोबाईल, ११ दुचाकी, ०२ चारचाकी वाहन असा एकुण २१,४४,६००/- रूचा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीतांवर महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली असुन पुढील तपास मोर्शी पोलीस करित आहेत. सदरची कारवाई मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक,
अमरावती ग्रा. मा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलीस निरिक्षक, स्था. गु.शा. यांचे नेत्वृतातील श्री. नितीन चुलपार, पो.उप.नि., पोलीस अमंलदार संतोष मंदाणे, रविन्द्र बावणे, बळवंत दाभणे, सचिन मिश्रा, भुषण पेठे, पंकज फाटे, निलेश मेहरे यांचे पथकाने केली आहे.