न्युज डेस्क – व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर आणले आहे. सध्या, व्हॉट्सॲपवर एखाद्याशी चॅट करण्यासाठी, तुम्हाला त्यांचा मोबाइल नंबर सेव्ह करावा लागायचा. मात्र आता या समस्येतून सुटका होणार आहे. कारण आता यूजर्स मोबाईल नंबर सेव्ह न करताही व्हॉट्सॲप चॅटिंग आणि कॉलिंग करू शकणार आहेत. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
काय करायचं
सर्वप्रथम, ज्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला चॅट करायचे आहे तो नंबर कॉपी करा.
यानंतर व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल.
यानंतर खालील न्यू चॅट ऑप्शन वर टॅप करा.
त्यानंतर वर एक सर्च बॉक्स दिसेल, ज्यावर कॉपी मोबाइल नंबर लिहावा लागेल किंवा तुम्ही थेट कॉपी पेस्ट करू शकता.जर व्हॉट्सॲप ला संपर्क सापडला नाही. तर चॅट सुरू करण्यापूर्वी तुम्हाला ते तुमच्या संपर्कांमध्ये सेव्ह करावे लागेल.
तर तुमी New Contact वर क्लिक करा. कॉपी मोबाइल नंबर लिहा व्हॉट्सॲपवर असेल तर त्याच्याशी संबंधित नाव लिहा आणि सेव दिसेल तेच्या वर क्लिक करा.
यानंतर, चॅट ऑप्शनवर क्लिक करताच एक नवीन चॅट विंडो उघडेल. त्यानंतर तुम्ही अनोळखी व्यक्तीकडून व्हॉट्सॲप वर चॅट करू शकाल.
मोबाईल क्रमांकाने लॉगिन करता येईल
आतापर्यंत तुम्हाला डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर व्हॉट्सॲप लॉग इन करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करावा लागत होता. कधीकधी QR कोड स्कॅन होत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला लॅपटॉपवर व्हॉट्सॲप चालवता येत नाही.
पण आता तुम्हाला मोबाईल नंबरने व्हॉट्सॲप लॉग इन करता येणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या मोबाइल नंबरवर इंटरनेट काम करत नसेल, तर त्या वेळीही तुम्ही डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर व्हॉट्सॲपवर लॉग इन करू शकता.