भंडारबोडी येथील शेताशिवरात कार्यक्रम संपन्न
रामटेक – राजू कापसे
रामटेक – आत्मा अंतर्गत शेती शाळेमध्ये काल दिनांक १७ जुलै रोज सोमवार ला कृषि तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषि परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत रामसागर शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकरी सदस्यांची भात पिकाची शेती शाळा ही श्री विजय शहारे यांच्या शेतावर घेण्यात आली. यामध्ये शेतकर्यांना श्री पद्धत व पट्टा पद्धत पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी सुरुवातीला शेतीशाळा प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणवुन घेण्यात आली. नंतर श्री पद्धत त्यामध्ये २५ x २५ सेंटीमीटरवर धान पिकाची लागवड त्यामध्ये प्रति चूड एक रोप रोवणी करून दाखवण्यात आली तसेच पट्टा पद्धतीमध्ये दहा ओळी नंतर ३० सेंटीमीटर गॅप देऊन पुन्हा समोरील रोवणी करावी ती (गॅप) पट्टा सरळ पूर्ण बांधिभर शेवटपर्यंत घेऊन जावं नंतर भात पिकाचे खत व्यवस्थापन मध्ये चिखलणी झाल्यानंतर ४० किलो नत्र २० किलो स्फुरद २० किलो पालाश प्रति एकर द्यावे व संपूर्ण स्फुरद व पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा चिखलीच्या वेळेस तर उर्वरित नत्राची अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात फुटवे फुटण्याच्या वेळी आणि लोंबी येण्याच्या सुरुवातीस देण्यात यावी.
ह्या विषयीची माहिती तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री राजेश दोनोडे यांनी दिली. तसेच कंपनी सी ई वो साहेबराव सोमकुवर, यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना पी.के.व्ही. डायरी वाटप करून त्यामधील शेतीशी निगडित अभ्यास करून त्याप्रमाणे शेती करावी असे आवाहन केले. यावेळी कंपनी संचालक हेमराज डोणारकर, राहुल दिवटे, बलिवान खरकाटे व पौर्णिमा बुराडे व इतर शेतकरी उपास्थित होते.