आलापल्ली येथे लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ,वाचनालयाचे उद्घाटन…
अहेरी – मिलिंद खोंड
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियोजन पूर्ण अभ्यास करून स्पर्धा परीक्षेचा गड सर करता येतो त्यासाठी सातत्य व चिकाटी ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन येथील अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी केले.
आलापल्ली येथिल श्रीराम चौकातील गोटूल भवनात राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय कल्याणकारी बहुद्देशीय संस्था आलापल्ली द्वारा संचालित लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तसेच आदिवासी गोटूल समिती आलापल्ली यांचा संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालयाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय कल्याणकारी बहुद्देशीय संस्था आलापल्ली चे अध्यक्ष गिरीश मद्देर्लावार, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव ,सरपंच ग्रा.प. आलापल्ली शंकऱ मेश्राम ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक खुर्शीद शेख,
प्रा. चिन्नन्ना चालूरकर माँ विश्व भारती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड ,आदिवासी गोटूल समितीचे अध्यक्ष रमेश मडावी, डॉ. चरणजित सिंग सलुजा, लक्ष्य अकॅडमीचे संचालक सतीश पनगंटीवार ,
विनोद दहागावकर ,शुभम नीलम ,सागर गाऊत्रे , लाडका राजा गणेश मंडळं चे संचालक . अतुल आत्राम अध्यक्ष रुपेश श्रीरामवार,सचिव मयूर त्रिनगरीवार स्वराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष सागर रामगोनवार , उपाध्यक्ष आदर्श केसनवार, सचिव कुणाल वर्धलवार आदीची उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या हस्ते तितकापून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना राठोड म्हणाले, प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या वृक्षावर प्रयत्नरूपी कुऱ्हाड सातत्यपूर्ण मारून तेव्हाच अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होत असते त्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन ,कृती व खबरदारी या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा मोलाचा सल्ला दिला.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शीद शेख , पोलीस निरीक्षक मानभाव, गिरीश मद्देर्लावार ,प्रा.चालुरकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अड. पंकज दहागावकर, आभार प्रदर्शन विनोद दहागावकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लाडका राजा गणेश मंडळं चे सदस्य त्रिशूल डांगरे, दशरत धुर्वे , अक्षय करपे, सिद्धार्थ भडके , अक्षय राहूत, रवी आत्राम, उदय गुरुनुले ,विजय गाऊत्रे .कैलास मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.