Friday, November 22, 2024
Homeराज्यकोगनोळी येथे गणरायाचे जंगी स्वागत...गणेश भक्तांचा मोठा जल्लोष...

कोगनोळी येथे गणरायाचे जंगी स्वागत…गणेश भक्तांचा मोठा जल्लोष…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरोना जागतिक महामारीचे संकट असल्याने गणेश उत्सव साजरा झाला. पण गणेश उत्सव जल्लोषात साजरा करता आला नाही.पण यंदा 2022 मध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त नसल्याने देशभरात अनेक ठिकाणी गणेश उत्सवात मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार असल्याचे बोलले जात आहे.

यंदाचा गणेश उत्सव बुधवार दि.31 तारखेपासून सुरू होत असला तरी कोगनोळी ता.निपाणी येथे मंगळवार दि.30 रोजीच गावातील काही मंडळांचा अपवाद वगळता सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी शासनाच्या नियमानुसार येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य,दिव्य व डोक्याचे पारणे फेडण्यासारख्या मिरवणूका काढण्यात आल्या.या मिरवणूकींना कोगनोळीसह आजुबाजुच्या परिसरातील हजारो शोकीनांनी उपस्थिती दर्शवली होती.यावेळी काही वेळ पावसाने जरी व्यथय आणला असला तरी गणेश भक्ताच्या उत्साहामध्ये कोणतीही कमतरता भासत नव्हती.

सदर मिरवणूका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर नजिकहुन प्रारंभ होऊन स्टँड सर्कल,बाजारपेठ नजीक,ग्रामदैवत अंबिका मंदिर इथुन आपापल्या मंडळाकडे मार्गस्थ झाल्या.या मिरवणूकींना कोणतेही गालबोट लाघु नये म्हणून व कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी कोगनोळी आऊट पोस्टचे बिट हवलदार राजु गोरखनावर आणि शिवप्रसाद यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तर निपाणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनीही याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: