Friday, November 22, 2024
Homeराज्यदर्यापुर बस स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटटल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात...

दर्यापुर बस स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटटल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर बस स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटटल चोराला ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ८१,०००/- रू चा मुददेमाल जप्त केला आहे. राजीक शहा रशीद शहा वय ३२ वर्ष रा. सुफी प्लॉट दर्यापूर असे चोरट्याचे नाव असून दर्यापूर पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मा. पोलीस अधीक्षक सा, अमरावती (ग्रामीण) यांनी जिल्हयात होत असलेल्या चोरी च्या घटनांना आळा बसावा याकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर चोरी चे गुन्हे उघडकीस आणने बाबात सुचना निर्गमित केल्या होत्या.

पोलिस स्टेशन, दर्यापुर येथे फिर्यादी नामे कु. तन्वी रामेश्वर पराडे वय १९ वर्ष रा. हनुमान नगर आकोट यांनी दिनांक १७/०५/२०२३ रोजी रिपोर्ट लिा की, ते दिनांक १६/०५/२०२३ रोजी दर्यापुर बस स्टैंड वरून आकोट बसमध्ये चढत असतांना कोनीतरी अज्ञात चोराने तिचे बॅग मधिल रिअलमी नारझो कंपनीचा मोबाईल व मोबाईलचे कव्हरमध्ये असलेले दोन हजार रूपये असा एकुन १४,०००/- रू चा मुददेमाल चोरून नेला वरून पोलीस स्टेशन दर्यापूर येथे अप क्रमांक ३३९ / २०२३ कलम ३७९ भादवी प्रमाने गुन्हा नोद झाला होता. ..

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक सदर गुन्हाचा समांतर तपास करीत असताना पथकाने गोपनिय माहितीवरून तसेच तांत्रीक माहितीच्या आधारे दिनांक १५/०७/२०२३ रोजी दर्यापुर येथे राहनारा राजीक शहा रशीद शहा वय ३२ वर्ष रा. सुफी प्लॉट दर्यापूर याला बस स्टैंड दर्यापुर येथुन ताब्यात घेवुन गुन्हयासबंधाने सविस्तर विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिले त्याला पुन्हा विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, दिनांक १६/०५/२०२३ रोजी मी बस स्टैंड दर्यापुर येथुन आकोट बस मध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेवुन एका मुलीचे पर्स मधुन नारझो कंपनीचा मोबाईल चोरला होता त्या मोबाईल चे कव्हर मध्ये दोन हजार होते ते मी खर्च केले अशा प्रकारे गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याने त्याचे अगोदर सुध्दा बस स्टैंड दर्यापूर येथुन वेगवेगळया कंपनिचे मोबाईल चोरल्याचे सांगीतले वरून त्याचे कडुन १) एक सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी एम २१ मोबाईल किंमत अंदाजे २०,००० /- रू २) एक विवो कंपनीचा वाय ३१ मोबाईल किंमत अंदाजे १८,००० /- रू ३) एक सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी ऐ १२ किं अं २०,०००/- रू ४) एक एम. आय कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल किं अं ५०००/- रू. ५) गुन्हयात चोरी गेलेला मोबाईल रिअलमी नारझो कंपनीचा किं अं. १८,०००/- रू असा एकुन ८१,०००/- रू चा मुददेमाल जप्त केला.

आरोपी नामे राजीक शहा रशीद शहा वय ३२ वर्ष रा. सुफी प्लॉट दर्यापूर याला पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन दर्यापुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साो श्री अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक श्री. शशिकांत सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्वात पो.उप.निरीक्षक संजय शिंदे व त्यांचे पथकातील अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सै. अजमत सै. शौकत, निलेश डांगोरे, अमोल केंद्रे, पोस्टे सायबर सेल चे रितेश वानखडे, चेतन गुल्हाने व चालक निलेश येते यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: