अमरावती ग्रामिण जिल्हयात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत या बाबीकडे विशेष लक्ष केन्द्रीत करून असा प्रकार आढळून आल्यास त्यावर त्वरीत प्रभावी कार्यवाही करण्याबाबत मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी आपले अधिनस्थ सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी तसेच स्था. गु.शा. पथकास आदेशित केलेले आहे.
दि.१२/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. शिरजगांव हद्दीत गुन्हेगार शोध करित असतांना गोपनिय माहीती मिळाली की, पो.स्टे. शिरजगांव हद्दीतील ग्राम करजगांव शेत शिवारात काही इसम ५२ पत्त्यांचे हार जितवर जुगार खेळ खेळीत आहेत.
प्राप्त माहीतीची शहानिशा करून स्वा.गु.शा. चे पथकाने सापळा रचुन सदर सार्वजनिक स्थळी जुगार रेड केला असता आरोपी नामे १) शे. जमील शे. कादीर वय ५२ २) शे. वहीद शे. इनायत, वय ४० ३) अ. सईद अ. सलाम, वय ५० ४) वसीम अहमद जिलाली खान, वय ३३ ५) शे.शरिक शे. अजिज वय ४० ६) अ. रेहान शे. मगर वय ३२ ७) मो. इक्बाल शे. शबीब, वय ३८,८) अकील अहमद हयात खान वय ५०, ९) अफजल खान हाफीज खान, वय ३८, १०) अलीम ऊर्फ बबलु खान, वय ३४ सर्व रा. करजगांव हे ५२ पत्यांवर पैश्याचे हार-जीतचा जुगार खेळ खेळीत असतांना मिळुन आले.
सदर आरोपीतांचे ताब्यातून नगदी २९, ४३०/- रु ०४ दुचाकी, ०६ मोबाईल संच तसेच जुगार साहीत्य असा एकुण ०३, २६, २८०/- रूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांवर महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये कारवाई करून पो.स्टे. शिरजगांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास शिरजगांव पोलीस करित आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. मा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलीस निरिक्षक, स्वा. गु.शा., अमरावती ग्रा. यांचे नेत्वृतातील श्री.सचिन पवार, स.पो.नि., पोलीस अमंलदार युवराज मानमोठे, रविन्द्र व-हाडे, स्वप्नील तंवर, शांताराम सोनोने, सचिन मिश्रा, संजय प्रधान व पो.स्टे. शिरजगांव येथील श्री. प्रशांत गिते, स.पो.नि.पोलीस अमंलदार सतिश पुनसे यांचे पथकाने केली आहे.