Saturday, November 23, 2024
Homeराजकीयअनेकदा खेटे मारूनही मिळाले नाही प्रमाणपत्र माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे...

अनेकदा खेटे मारूनही मिळाले नाही प्रमाणपत्र माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे नेते दीपक आत्राम यांच्या पुढाकाराने शेकडो उमेदवारांना मिळाले पेसा प्रमाणपत्र…

शेकडो बेरोजगार युवक – युवतींनी मानले आभार…

गडचिरोली – मिलिंद खोंड

महाराष्ट्र शासनाने तलाठी व वनरक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.यात पेसा समाविष्ट गावातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.मात्र मागील काही दिवसापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी मार्फत पेसा प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याच्या कारणाने बेरोजगार युवक,युवतीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

ही अडचण दूर करून त्वरित पेसा प्रमाणपत्र देण्यासाठी बेरोजगार युवक,युवतींनी नुकतेच भारत राष्ट्र समिती चे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट घेऊन सदर समस्या लक्षात आणून दिल्यावर समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी शेकडो युवक युवतींना सोबत घेऊन अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री अंकित यांच्या सोबत चर्चा करून तलाठी व वनरक्षक पदासाठी अर्ज करण्याची मुदत संपत आलेली आहे तरी पेसा प्रमाणपत्रासाठी विलंब न करता तात्काळ प्रमाणपत्र देण्याची विनंती केल्यावर,प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ शेकडो मुलांना पेसा प्रमाणात दिले.

या पेसा प्रमाणपत्रासाठी अहेरी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अहेरी,सिरोंचा व मूलचेरा तालुक्यातील शेकडो युवक युवती रोज प्रकल्प कार्यालयात येत होते.त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

पण आता तात्काळ पेसा प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांना अर्ज भरण्यासाठी होणारी समस्या दूर झाल्याने याबद्दल बेरोजगार युवक युवतींनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: