सरपंचाचे विभागीय नियंत्रक अधिकाऱ्यांना निवेदन…
पातूर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील खेट्री बस फेऱ्या गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बस फेऱ्या सुरू करण्यासाठी सरपंच जहूर खान यांनी थेट विभागीय नियंत्रक अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी निवेदनद्वारे केली आहे.
सुकळी ते पिंपळखुटा रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले होते,त्यामुळे सकाळ आणि रात्रीचा असे दोन्ही खेट्री बस फेऱ्या बंद झाल्या होत्या त्यामुळे वर्षभरापासून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत पायी ये जा करावी लागत असल्याचे चित्र आहे. तसेच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन खाजगी वाहनात प्रवास करावे लागत आहे.
त्यामुळे सरपंचाने पुढाकार घेऊन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अकोला यांच्याकडे धाव घेऊन नुकतेच निवेदन दिले आहे. यावर लवकरच बस फेऱ्या सुरू करण्यात येईल असे आश्वासन विभागीय नियंत्रक अधिकारी यांनी दिली आहे.
वर्षभरापासून खेट्री बस फेऱ्या बंद झाल्याने जीव मुठीत घेऊन खाजगी वाहनात प्रवास करावा लागतो त्यामुळे मोठी घटना होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी दखल घेऊन बस फेऱ्या सुरू करण्यात यावे
बंडू रेवाळे ग्रामस्थ खेट्री
विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी ८ किलोमीटर पायपीट
खेट्री येथील विद्यार्थी शिक्षणासाठी चान्नी, सस्ती,येथे विद्यालया शिक्षण घेत आहे. परंतु बस फेऱ्या बंद असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी ८ ते १२ किलोमीटर पायपीट होत आहे.
रस्त्याचे काम रखडल्याने गेल्या वर्षभरापासून खेट्री बस फेऱ्या बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान तसेच प्रवाशांचे हाल होत असल्याने विभागीय नियंत्रक अधिकारी यांच्याकडे विवेदन दिले आहे. जहूर खान सरपंच खेट्री