आरोपीचे नाव :- राजेश पंजाबसिंग भादा, वय ३३ वर्षे, रा. रोहना, ता. पट्टन, जि. बैतुल म.प्र.
अमरावती – मागील काही काळात अमरावती ग्रामिण जिल्हयात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा आढावा घेवुन सदर दुचाकी चोरीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच दुचाकी चोरीचे गुन्हयात आरोपी निष्पन्न करण्याबाबत मा.अविनाश बारगळ,पोलीस अधिक्षक, अमरावती यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच अधिनस्थ सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.
आज दि.०९/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. वरूड हद्दीत पेट्रोलींग करित असतांना आरोपी नामे राजेश पंजाबसिंग भादा, वय ३३ वर्षे, रा. रोहना, ता. पट्टन, जि. बैतुल म.प्र. हा संशयास्पदरित्या· फिरत ་. असतांना दिसुन आला. सदर आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याचे ताब्यातील दुचाकीने सुसाट वेगाने पळुन जाण्याचा प्रयत्न केला.
पोलीसांनी सदर आरोपीचा सिनस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले असता प्रथम त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली, परंतु विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता सदर आरोपीने पोलीस स्टेशन बेनोडा येथे मोटार सायकल चोरीचे ०२ तसेच अमरावती शहर येथील पो.स्टे. गाडगेनगर येथील मोटर सायकल चोरीचा ०१ असे एकुण ०३ गुन्हे केली असल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीचे ताब्यातुन चोरीच्या ०३ मोटार सायकल किं. १,५०,०००/- च्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीस पुढील कार्यवाही करिता पो.स्टे.बेनोडा यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास बेनोडा पोलीस करत आहेत.
सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पो. नि., स्था. गु. शा., श्री. नितीन चुलपार, पो.उप.नि., पो. अमंलदार संतोष मुंदाणे, बळवंत दाभणे, भुषण पेठे, रविन्द्र बावणे, भुषण पेठे, पंकज फाटे यांचे पथकाने केली आहे.