न्युज डेस्क – तुम्हाला आठवत असेल की एकेकाळी तुम्ही स्मार्टफोनमधील बॅटरी बदलू शकता. पण स्मार्टफोन ब्रँडने फिक्स्ड बॅटरी द्याला सुरुवात केली. मात्र, आता पुन्हा स्मार्टफोनमध्ये बॅटरी काढता येणार आहे. कारण स्मार्टफोनच्या बॅटरीसाठी नवीन नियम लागू करण्यासाठी युरोपियन युनियन अर्थात EU कडून दबाव आणला जात आहे. जर नवीन नियम लागू झाला, तर यूजर्स फोनची बॅटरी स्वतः बदलू शकतील.
न काढता येण्याजोग्या बॅटरींमुळे इलेक्ट्रॉनिक कचरा वाढत असल्याचे युरोपियन युनियनचे म्हणणे आहे. सध्या फोनची बॅटरी खराब झाल्यामुळे स्मार्टफोन बदलावा लागतो. पण फोनची बॅटरी बदलण्याचा मार्ग सोपा झाला तर स्मार्टफोनचे आयुष्य वाढेल.
काढता येण्याजोग्या बॅटरीचे फायदे
- जर स्मार्टफोनमध्ये बॅटरी बदलण्याची सुविधा उपलब्ध असेल, तर लोक ऑनलाइन खरेदी करून बॅटरी बदलू शकतील. याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक सेवा केंद्राचाही फायदा अपेक्षित आहे.
- स्मार्टफोनची जुनी बॅटरी बदलून स्मार्टफोनमध्ये नवसंजीवनी मिळू शकते. याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन बराच काळ वापरू शकता.
- संपूर्ण फोन बदलण्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याऐवजी, तुम्ही फक्त नवीन बॅटरी खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमची खूप बचत होऊ शकते.
- यामुळे स्मार्टफोनमध्ये अतिरिक्त लेयर सुरक्षा मिळते.
काढता येण्याजोग्या बॅटरीचे तोटे
- काढता येण्याजोग्या बॅटरीमुळे स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे फोन स्लिम ठेवला जाणार नाही.
- काढता येण्याजोग्या बॅटरीमुळे फोन वॉटरप्रूफ बनवणे कठीण होईल.
- बॅटरी काढून टाकल्याने स्मार्टफोनच्या बॅटरी क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.