Friday, September 20, 2024
Homeदेशअमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील ते १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित;...

अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील ते १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित; जिल्हा प्रशासन संपर्क ठेवून सतर्क…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड येथील 18 भाविक व त्यांच्यासोबत पुणे येथील 1 असे 19 भाविक नांदेड येथून मनमाड व पुढे मनमाड वरून जम्मू मार्गे आमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत.

ते पहलगाम येथे पोचून पुढे दिनांक 6 जुलै 2023 रोजी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले परंतू खराब हवामानामुळे ते अमरनाथ गुफेपासून 6 किमी अलीकडे पंचतरणी येथे अडकून पडले आहेत. सध्या ते आर्मी कॅम्प मध्ये सुरक्षित आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आढावा घेवून तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक व्यवस्था केली आहे. वातावरण अनुकूल झाल्याबरोबर सर्वांना सुरक्षितरित्या पहलगाम येथे आणण्यात येईल त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे समन्वय साधत असून जिल्ह्यातील खालील व्यक्ती या तिथे अडकलेल्या आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.अनिल पांपटवार, संजय मनाठकर, राजेंद्र मनाठकर, मंजुषा दमकोंडवार, अरुण दमकोंडवार, प्रवीण सोनवणे, विजया सोनवणे विजयनाथ तोनशुरे, शिवकांता तोनशुरे, सुरेखा पत्रे, शामल देशमुख, प्रमोद देशपांडे, मंजुषा देशपांडे, मिसेस कडबे, तुकाराम कैळवाड, पंकज शीरभाते, प्रणिता शिरभाते, आकुलवार, निलेश मेहेत्रे अशी आहेत.

अधिक माहितीसाठी नातलगांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील यांच्याशी +91 94228 75808 या मोबाईल क्रमांकावर साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: