Tuesday, November 5, 2024
Homeराज्यसदलगा तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथे स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचा भव्य...

सदलगा तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथे स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचा भव्य मेळावा संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

पश्चिम महाराष्ट्र आणि लगत असलेला कर्नाटक सीमा भागामध्ये उसाचे प्रचंड असे उत्पादन घेतले जाते त्या अनुषंगाने या भागांमध्ये ऊस वाहतूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे ऊस तोडणी साठी लागणारे ऊस तोड मजूर मराठवाडा विदर्भ बीड त्याचबरोबर कर्नाटक येथील विजापूर इंडी गदक या भागांमध्ये सुद्धा मजूर मोठ्या प्रमाणामध्ये भेटतात त्यामुळे महाराष्ट्रातील व कर्नाटकातील ऊस वाहतूकदारांचे व्यवहाराच्या अनुषंगाने एकमेकांमध्ये समन्वय साधने गरजेचे आहे ही गरज ओळखून सदलगा या ठिकाणी ऊस वाहतूकदारांचा मेळावा संपन्न झाला.

यावेळी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक पृथ्वीराज संभाजी पवार भैया यांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो कोटीची फसवणूक करून अनेक मुकादम हे कर्नाटक मध्ये आश्रयास येत आहेत हे मुकदम येथिल शेतकऱ्यांना फसवू नये याची काळजी घेण्याकरता स्वाभिमानी वाहतूक संघटनेत संघटित राहून लढा उभा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी ऊस्वती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज देशात आणि राज्यात महामानवांचे महापुरुषांचे व शेतकऱ्याचे नाव घेऊन फक्त राजकारणात उपयोग केला जात आहे.

आज शेतकऱ्याच्या पदरी आनंत अडचणी असताना शेतीला जोडधंदा म्हणून ऊस वाहतुकीचा व्यवसाय करणारे अनेक ऊस वाहतूकदार शेतकरी आज कोठ्यावधी रुपयांची फसवणूक झाल्यामुळे कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या च्या वाटेवरती आहेत पण आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडणार नाही त्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई सुद्धा लढू असा ऊस वाहतूकदारांना विश्वास देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन झाल्यानंतर अजित राजोबा, प्रवीणकुमार शेट्टी,सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी आपले मनोगतातून या व्यवसायातील अडचणी त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यापासून उभा केलेला लढा या बाबत मांडणी करून प्रशासनावर घनाघात केला.

त्यानंतर सदलगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकसो यांना निवेदन देऊन फसवणूक करणाऱ्या मुकादमावर कार्यवाही करण्याबाबत विनंती केली या कार्यक्रमाचे आभार पंकज तिप्पांण्णावर यांनी केले. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेची सुकाणू समितीचे प्रमुख तसेच कर्नाटक सीमा भागातील 1100 ऊस वाहतूकदार या ठिकाणी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: