राजस्थानमधील जोधपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एका महिलेने तिच्या दोन निरागस मुलांसह ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. पतीच्या बेवफाईला कंटाळून महिलेने निष्पाप मुलांसह आपले जीवन संपवले. या घटनेला जबादार असलेल्या पती आणि त्याच्या प्रियसीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस त्या दोघांचा आता शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीला आश्चर्यचकित करण्यासाठी ती न सांगता जोधपूरला पोहोचली तेव्हा पती दुसऱ्या मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला. पतीला असे पाहून तिच्यावर अस्मान कोसळल्या सारखा झालंय. त्यानंतर ही नवर्याची गद्दारी सहन न झाल्याने महिलेने दोन मुलासह मृत्यूला कवटाळले.
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला गावात राहत होती. तर तिचा नवरा जोधपूर शहरात राहत होता. पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ती जोधपूरमध्ये पतीच्या खोलीत पोहोचली, तिथे गेल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तेथे तिचा पती एका तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. हे पाहून महिलेने पतीच्या बेवफाईचे पुरावे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि मुलासह रडत रडत निघून गेली. ही महिला इतकी दुखावली गेली की तिने गावी जाण्याऐवजी दोन्ही निरागस मुलांसह रेल्वेसमोर उडी मारली.
आरोपी पती व तरुणी फरार
त्याचवेळी जोधपूर पोलीस आयुक्तालयाच्या करवड पोलीस ठाण्यात या आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिरमा देवी यांनी आपल्या दोन मुलांसह सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नागौर रोड येथील मंडलनाथ परिसरात फलोदीहून येणाऱ्या मालगाडीसमोर उडी मारली होती.
या अपघातात महिलेसह दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्यांनी मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. त्या ट्रेनच्या चालकाने ट्रेन थांबवून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. पोलिसांनी मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पती आणि आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. घटनेनंतर महिलेचा पती सुरेश हा फरार आहे. त्याच्या अटकेनंतर परिस्थिती स्पष्ट होईल.
महिलेला तिच्या पतीवर संशय होता
जोधपूर जिल्ह्यातील लोहवत पल्ली बिश्नोईया येथील धानी येथील रहिवासी बिरमा देवी हिचा विवाह 2016 मध्ये सुरेश बिश्नोईसोबत झाला होता. लग्नानंतर आधी कार्तिक मग विशालचा जन्म झाला. लग्नाच्या 4 वर्षांपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. सुरेश नोकरीच्या शोधात गावातून जोधपूर शहरात आला. येथे भाड्याने खोली घेऊन राहू लागले. 2021 मध्ये अचानक पती-पत्नीमध्ये भांडण झाले, ज्यामुळे सुरेश बहुतेक जोधपूरमध्ये राहू लागला.
गेल्या 2 वर्षांपासून पतीवर संशय घेतल्यानंतर बिरमा देवी यांनी पती आणि सासरच्या मंडळींना सांगितले होते. यासंदर्भात एक बैठकही झाली होती, ज्यात सुरेशने आपले कोणत्याही महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे स्पष्टपणे नकार दिल्याचे नातेवाइकांनी सांगितले. तेव्हापासून तो बिरमापासून दूर राहू लागला. जोधपूरहून तो क्वचितच गावी येत असे.