Wednesday, October 30, 2024
Homeगुन्हेगारीखूनाच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता...

खूनाच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता…

संजय आठवले

दहिहांडा पोलीस स्टेशन येथे दि. १५/०१/२०१५ रोजी फिर्यादी दत्ता गणेश लकडे रा. कुटासा ता. आकोट जि. अकोला यानी कुटासा येथील रहीवासी बाळु राजाराम पातोंड याच्या विरूद्ध कैफियत सादर केली होती. ज्यात त्यांनी त्याचे वडील गणेश शंकर लकडे यांचा खुन केल्याचा आरोप बाळु राजाराम पातोंड याचेवर केला होता.

ज्याचे आधारे दहिहांडा पोलीस स्टेशन येथे अपराध कं. ०५/२०१५ भा.द.वि. कलम ३०२ अंतर्गत बाळु राजाराम पातोंड याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अपराधामध्ये आरोपी बाळु राजाराम पातोंड याची आकोट जिल्हा व सत्र न्यायालयातुन जामिनावर सुटका झाली होती.सदर प्रकरण आकोट जिल्हा व सत्र न्यायालय येथे न्याय प्रविष्ट होते.

या प्रकरणात आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरीता सरकार पक्षानी न्यायालय समक्ष फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर असे एकुण ९ साक्ष पुरावे तपासले. परंतु यामध्ये आरोपी दोषी असल्याचे सिद्ध न झाल्याने विद्यमा अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर आकोट यांनी साक्ष अभावी आरोपी बाळु राजाराम पातोंड याला दि. २९/०८/२०२२ रोजी सदर प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. सदर प्रकरणात आरोपी तर्फे फौजदारी अधिवक्ता फसी अंजुम काझी यांनी प्रकरण युक्तिवाद केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: