गडचिरोली – मिलिंद खोंड
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील रहिवासी असलेले व्येंकटेश शंकर इप्पाला यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे २६ मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या आणि नुकताच निकाल लागलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता घेण्यात आलेल्या राज्यपात्रता परीक्षा २०२३ अर्थात सेट परीक्षेमध्ये दुसऱ्या प्रयत्नात गणित विषयात यश संपादन केले आहे….
व्येंकटेश ची आई लक्ष्मी इप्पाला गृहिणी असून चे वडील शंकर लचय्या इप्पाला हे सिरोंचा वनविभागात वनपाल या पदावर कार्यरत आहेत. व्येंकटेश लहानपणा पासून अभ्यासात हुशार आहे. त्यांचा प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आलापल्ली व माध्यमिक शिक्षण राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली तसेच उच्चमाध्यमिक शिक्षण राजे धर्मराव जुनिअर कॉलेज आलापली येथे झाले.
डिग्री चे शिक्षण राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरी येथे झाले. पदवीत्तर शिक्षण गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे झाले आहे….पहिल्या वर्गापासून व्येंकटेश वर्गात प्रथम असायचा… इतकेच नव्हे तर पदवी आणि पदवीत्तर शिक्षण घेतांनाही महाविद्यालयात प्रथम असायचा..तो विद्यापीठातून गणित विषयात सुवर्ण पदक विजेता होता….विशेष म्हणजे गडचिरोली सारख्या दुर्गम भागात राहून व्येंकटेश ने कोणतीही शिकवणी लावली नव्हती…
शिक्षण हे खेडे असो की शहर कुठेही घेता येते… परिस्थिती कितीही विषम असली तरीही जिद्द आणि अंगात परिश्रम करण्याची ताकत असेल तर यश नक्कीच मिळते असे व्येंकटेश सांगतो… गणित विषय हा सर्वात कठीण समजला जातो. अभ्यासातील जिद्द आणि अथक परिश्रमाने सेट परीक्षेत यश संपादन करून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
या यशाबद्दल सर्व स्तरावरून व्येंकटेश चे कौतुक केले जात आहे.व्येंकटेश ने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे. विशेष म्हणजे व्येंकटेश चे पीएचडी चे शिक्षण सुरु असून त्यांचा विषय (General Relativity ) हा आहे…
भविष्यात संशोधन या क्षेत्रात जाण्याचा त्यांचा माणस आहे… अतिशय दुर्गम क्षेत्र आणि विपरीत परिस्थितीतुन मार्ग काढत व्येंकटेश ने हे यश संपादन केले आहे. अनेकांनी त्याला त्याच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत..