Friday, November 22, 2024
Homeराज्यसुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आषाढी एकादशी...

सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा साजरा…

सांगली – ज्योती मोरे.

विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा पूजन व माऊली पालखी पादुका पूजन शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.अधिकराव पवार सर , प्रमुख अतिथी हरिभक्त महादेव विसापुरे व कार्यक्रमास आवर्जून उपस्थित पालक यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडी सोहळा नव कृष्णा व्हॅली स्कूल ते अग्निशमन कार्यालय असा होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार सर यांनी केले. अग्निशमनचे प्रमुख विमोचक मा. श्री एम व्ही साळुंखे व सौ साळुंखे यांचे स्वागत प्रमुख अतिथी व प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या शुभहस्ते श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

यानंतर प्रमुख अतिथीनी मार्गदर्शनात संतांची कामगिरी व मानवता, सुसंस्काराचे लेणे याविषयी मार्मिक असे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.यावेळी अग्निशमनचे श्री टी एम गडदे अग्निशमन विमोचक , एस एल पाटील ,एस बी माळी, व्ही जी राणे एन बी काळे , यंत्रचालक चौधरी असे सर्व स्टाफ उपस्थित होते.

krishna vally school sangli

इयत्ता नर्सरी ते दहावी विद्यार्थी व विद्यार्थिनीनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत मुक्ताई संत ज्ञानेश्वर यांच्या भूमिकेमध्ये येऊन त्यांनी त्यांच्या वेशभूषेचे थोडक्यात माहिती दिली सर्व विद्यार्थिनींनी दिंडी सोहळ्यामध्ये रिंगण करून पारंपारिक खेळ फुगडी अभंग भजन कीर्तन भारुड इत्यादींच्या माध्यमातून संतांचा महिमा मांडण्याचा प्रयत्न केला अग्निशमन स्टाफ कडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. या दिंडी सोहळ्यात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता भोसले यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: