Friday, November 22, 2024
Homeराज्यपातूर | वीर जवान सुरेश महल्ले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंकार...

पातूर | वीर जवान सुरेश महल्ले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंकार…

तुलंगा बुद्रुक या गावात करण्यात आले अंत्यसंकार…हजारो नागरिकांनी सश्रूनयनांनी वाहिली श्रद्धांजली…

पातूर – निशांत गवई

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुंलगा बु येथील ११९ इंजिनिअर रेजिमेंट झासी येथे सैन्य दलात कार्यरत असलेले ४० वर्षीय सैनिक सुरेश मोतीराम महल्ले हे कर्तव्यावर असतांना मंगळवार रोजी हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तुंलगा बुद्रुक येथील शेतकरी कुटूंबामधील असलेले सुरेश मोतीराम महल्ले हे वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजे २००३ साला मध्ये देशसेवेत रुजू झाले होते.

वीस वर्ष सेवा देऊन झाले असून त्यांच्या मागे आई व पत्नी, एक मुलगा १० वर्ष,तर दुसरा मुलगा ८ वर्षाचा असून परिवार सुद्धा त्यांच्या सोबत होता. आज त्याचे पार्थिव सैन्याच्या वाहनातून त्यांची जन्मभिमी असलेल्या तुलंगा बुद्रुक येथे आणण्यात आले असता ठीक ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जनसमुदाय जमला होता सकाळी ११ वाजता त्याचे पार्थिव त्याच्या रहत्या घरी पोहचले व त्या नंतर दुपारी १२ वाजता सैनिक सुरेश मोतीराम महल्ले यांच्यावर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपल्या गावातील लाडक्या सैनिकाला श्रद्धाजली देण्याकरिता पोलीस अधीक्षक घुगे,बाळापूर चे आमदार नितीन देशमुख,विधानसभा आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार बळीराम सिरस्कार,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर,प्रमोद देडवे ,मिलींद इंगळे,चान्नी चे ठाणेदार विपुल पाटील,तहसीलदार रवी काळे ,सरपंच खुशाल
तायडे,पोलीस पाटील अशोक तायडे, तसेच आजू बाजूच्या परिसरा मधील सैन्यात सुट्टीवर आलेले मेजर भूषण गवई, रोशन अरखराव,गोलू गवई, गजानन ठाकरे, महादेव ताले,प्रितम डोंगरे,आदी युवा गावतील महिला व

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: