आकोट – संजय आठवले
सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने राज्यभरात बुथ स्तरापर्यंत पक्ष बांधणी मोहीम सुरू करण्यात आली असून त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात बुथ कमिटी बांधणी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता स्वतंत्ररित्या जिल्हा बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील तत्पर, समर्पित तथा दमदार व्यक्तिमत्त्वांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातून या पदाकरिता कैलास गोंडचर यांची निवड करण्यात आली आहे. ते आकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची ही नियुक्ती केली आहे.
कैलास गोंडचर यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेता अजित पवार, राजेंद्र शिंगणे, संजय खोडके, प्रवीण पाटील कुंटे, आमदार अमोल मिटकरी, अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना दिले आहे.