सांगली – ज्योती मोरे
आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज सकाळी सांगली पोलीस दलातर्फे शहरातील विविध भागातून पथसंचलन करण्यात आले.
सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख,विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, वाहतूक सुरक्षा दल,राखीव पोलीस दल ,यांच्यासह अनेक पोलीस शिपाई सहभागी झाले होते.