सांगली – ज्योती मोरे
तासगांव पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार प्रमोद उगारे टोळीला पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगली सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातून एक वर्षांसाठी तडीपरीचा आदेश पारित केला आहे.दरम्यान टोळीप्रमुख प्रमोद उगारे वय 25, बाबू उर्फ प्रमोद वसंत माने उर्फ गरड वय 30, आणि विशाल उर्फ कृष्णा सिद्धू उणउणे वय 22 हे सर्वजण राहणार सावळज तालुका तासगांव,
या टोळी विरुद्ध सन 2014 ते 2022 दरम्यान तासगांव, कवठेमहांकाळ, सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, चोरून वाळू वाहतूक, गर्दी करून मारामारी, घातक शस्त्रांद्वारे इच्छापूर्वक दुखापत, करणे मालमत्ता जबरीने घेण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत, जबरदस्तीने घरात अतिक्रमण असे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत.
हे सर्वजण कायदा न जुमानणारे असल्याने सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये तासगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार सर्व अवलोकन आणि चौकशी करून उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचा चौकशी अहवाल तसंच टोळी विरुद्धचा गुन्ह्यांचा सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्या हालचाली लक्षात घेऊन तडीपारीचा आदेश पारित करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डोबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार सिद्धाप्पा रुपनर,पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, तसेच तासगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईक विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत गवळी आदींनी भाग घेतला.