अकोला – अमोल साबळे
गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे (अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील) पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत २० जून रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आली आहे.
त्यामध्ये गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यात २१ हजार ८४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ६५६ शेतकऱ्यांसाठी ८६ कोटी ७२ लाख लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
दोन हेक्टरच्या मर्यादेत अशी मिळणार मदत!
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारीत दरानुसार व निकषानुसार सतत पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जाणार आहे.
त्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर २२ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे.
सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान व निकषानुसार १ हजार ५०० कोटी रुपयांचा मदत निधी वितरित करण्यास
निर्णय २० जून रोजी निर्गमित करण्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ८६ कोटी ७२ लाख ७० हजार रुपयांचा मदत निधी
गेल्या २०२२ मधील पावसाळ्यात मंजुरी देण्यात येत असल्याचा शासन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खात्यात जमा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे तहसीलदारांना निर्देश !
शासन निर्णयानुसार गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ८६ कोटी ७२ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. ही मदत शासनाकडून थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने पिकांचे नुकसान झालेल्या जिल्हयातील शेतकयांच्या याद्या तातडीने शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हयातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत, असे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी सांगीतले.
वर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबर व ७० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य आला. त्यानुसार सततच्या पावसामुळे ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या मदत शासनाकडून मंजूर केली आहे.
मंजूर आली असून, मदतीची ही रक्कम आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या कालावधीत सततच्या पावसाने जिल्ह्यात केलेली ८६ कोटी ७२ लाख ७० हजार १ लाख ३३ हजार ६५६ शेतकऱ्यांचे ९१ रुपयांच्या मदतीची हजार ८४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे संबंधित शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानीची रक्कम शासनामार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.