Friday, November 22, 2024
Homeराज्यजागतिक रक्तदान दिनानिमित्त सौरभ वाघोडे यांचा सन्मान...

जागतिक रक्तदान दिनानिमित्त सौरभ वाघोडे यांचा सन्मान…

अकोला ब्लड बँक व संत गाडगेबाबा सेवा समिती गोरक्षण रोड अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथे रक्तदाता कृतज्ञता सोहळा आयोजित केला गेला होता. या ठिकाणी रक्तदान संदीप चांडक आय.एम.ए.अध्यक्ष, श्री भाऊराव घुगे पोलीस निरीक्षक सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन, श्री शौकत अली मेरी साहब जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष,  श्री सुगत वाघमारे अध्यक्ष तिक्षणगत बहुउद्देशीय कल्याण समिती,डॉक्टर केके अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाराष्ट्रभरामध्ये रक्तदान सर्वश्रेष्ठ दानाच्या माध्यमातून जनसामान्यांची गोरगरिबांची सेवा करणाऱ्या रुग्णकसेवक सौरभ वाघोडे यांना प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले. ज्या वयामध्ये तरुणांनी काय करावं हे कळत नाही त्या वयामध्ये अकोल्यातील २३ वर्षाचा एक तरुण आपल्या सर्व टीम सोबत २४ तास गरजू रुग्णांकरिता झटत असतो. 

सरकारी दवाखाने असो की प्रायव्हेट हॉस्पिटल, कुणाला रक्ताची गरज असो की कुठल्याही रोगावरचा इलाज करायचा असो, हा युवक एका कॉलवर हजर असतो. जे रुग्ण सरकारी योजनांपासून अनभिज्ञ आहेत, विशेष करून दिव्यांग बांधव त्यांना सरकारी योजनांची माहिती देणे, जिल्हा सरकारी रुग्णालयात महिन्यातून एक दिवस रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकरिता अन्नदान करणे, गावोगावी जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदान करण्याकरिता तरुणांना आवाहन करणे हे सौरभचे नित्याचेच कार्यक्रम आहेत. कोरोनाकाळात तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने अनेक रुग्णांना उपचाराकरिता मदत केली.

सौरभने आजपर्यंत 8 ते 9 हजार गरजू रुग्णांना रक्तदाते मिळवून दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अकोला जिल्ह्यातील तब्बल १३ थॅलेसेमियाग्रस्त मुले सौरभने दत्तक घेतली आहेत व त्या मुलांना दर महिन्याला तो रक्त उपलब्ध करुन देतो. गावोगावी जिल्ह्यातील मोठं- मोठ्या डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत रोगनिदान शिबिरे आयोजित करुन आजपर्यंत त्याने एक हजारपेक्षा जास्त गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत.सेवा परमो धर्म: या तत्त्वावर चालून सेवा एकाच धर्मासाठी काम करणारा सौरभ हा आजच्या पिढीसाठी सर्वांगाने अत्यंत प्रेरणादायी युवक आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: