रामटेक – राजू कापसे
माजी आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी साहेब यांच्या प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण सन २०२२-२३ मधील पर्यटन स्थळ विकास योजने अंतर्गत रामटेक तालुक्यातील अंबाळा तलाव येथील यात्री निवास भवन (लोधी समाज भवन) परिसर विकास करिता रु. ५०.०० लक्ष निधि माजी आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या प्रयत्नाने आता ते माजी आमदार असताना मंजुर करण्यात आले.
तसेच डि. मल्लिकार्जुन रेड्डी आमदार असताना रामटेक तालुक्यातील अंबाळा तलाव येथील यात्री निवास भवन (लोधी समाज भवन) परिसर विकास करिता रु. ५०.०० लक्ष निधि मंजुर करण्यात आला होता.
आतापर्यन्त माजी आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी साहेब यांच्या प्रयत्नाने लोधी समाज धर्मशाळा अंबाळा, रामटेक करिता एकूण रु. १.०० कोटी चा भरीव शासकीय निधि मंजुर करण्यात आला आहे करिता त्यांचे कोटी कोटी धन्यवाद तसेच अभिनंदन यानिमित्ताने समजातर्फे करण्यात आले आहे.
यावेळी पत्रपरिषदेला रामटेक पंचायत समिती उपसभापती नरेंद्र बंधाटे,ईश्वर भैय्याजी बसीने,चिचाळाा चे उपसरपंच सुनिल गयगये,सदस्य शेषराव मोहारे, सतीश गयगये,करीमभाई मालाधारी रामटेक तालुका लोधी समाज बांधव उपस्थित होते