सांगली – ज्योती मोरे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील मंगलमूर्ती कॉलनीतील गल्ली नंबर 2 मध्ये नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून फुलराऊड बंदिस्त गटार करण्याच्या कामास आज सुरुवात झाली आहे.
सदर कामाची पाहणी नगरसेवक विष्णू माने यांनी करून सदर काम उत्तम दर्जाच्या करण्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या आहे. इथल्या स्थानिक नागरिकांची बऱ्याच दिवसांपासून ची मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.