Saturday, November 23, 2024
Homeराज्यतांत्रिक कामगारांचा शासन, प्रशासना विरुद्ध हल्लाबोल...

तांत्रिक कामगारांचा शासन, प्रशासना विरुद्ध हल्लाबोल…

राज्यभरातून तांत्रिक कामगाररांची उपस्थिती

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन व प्रशासन उदासिन असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याकरीता तांत्रिक कामगार युनियन 5059 संघटनेच्या वतीने मुंबईच्या आजाद मैदानावर बुधवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले. यामध्ये राज्यभरातून आलेल्या कामगारांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत एकच हल्लाबोल केला. अशी माहीती तात्रिक कामगार युनियन रनं. 5059 चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी दिली.

महावितरण कंपनीमधील तांत्रिक कामगारांवर वसुली करीता होणारी दडपशाही व एकतर्फी कार्यवाही त्वरीत थांबवादी तसेच एल. टी. एच.टी. लाईन व 33 के.व्ही उपेकदाची दुरूस्ती करण्यात यावी. सन 2018 ते 2023 हया पगार वाढ कराराप्रमाणे वर्ग 3 व 4 मधील तांत्रिक कामगारांना वाढीव इंधन भत्ता त्वरीत लागु करावा.

तसेच तांत्रिक कामगारांना महीण्याला 20 लिटर प्रमाणे इधन भत्ता देण्यात यावा, महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांनी पदोन्नती नाकारल्यास उच्च वेतनश्रेणीचे लाभ महानिर्मिती व महापारेषण कंपनीप्रमाणे संरक्षित करण्यात यावा, विन्ही कंपनीतील तांत्रिक कामगारांना स्वतंत्र चेतन श्रेणी देण्यात यावी, कंपनी मधील कार्यरत चतुर्थ श्रेणीतील तांत्रिक कामगारांना महानिर्मीती व महापारेषण प्रमाणे तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नत करण्यात यावे, महावितरण व महापारेषण मधील यंत्रचालकांच्या पे प्रोटेक्ट मध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.

त्यामुळे महावितरण मधील यंत्रचालकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरी महापारेषण प्रमाणे महावितरण मधील यंत्रचालकांचे पे प्रोटेक्ट करण्यात यावे. दि. 01/04/2019 नंतर कार्यान्चीत झालेले उपकेंद्र खाजगी रित्या चालविल्या जात आहे. सदरहु उपकेद्रामध्ये त्वरीत कंपनीचे यंत्रचालकांचे पदे मंजुर करावे, तिन्ही कंपनीमध्ये तांत्रिक कामगारांच्या वैद्यकीय कारणास्तव व विनंती बदल्या ची कार्यवाही त्वरीत सुरू करण्यात यावी.

महावितरण तांत्रिक कामगारांचे सन 2020-2022 व सन 2022 2024 चे रजा रोखीकरण त्वरीत अदा करण्यात यावे, विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक यांची जाहीर करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे. तसेच तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सर्व रिक्त पदे तात्काळ सरळ सेवा भरती व्दारे भरण्यात यावे, महानिर्मिती कंपनीकडील 35 वर्ष आयुर्मान झालेली जल विद्युत के नुतनीकरण करून परिचलनासाठी खाजगी उद्योजकांना देण्याचा पाटबंधारे विभागाचा मानस आहे.

ती सर्व जल विद्युत केंद्रे महानिर्मिती कंपनीने स्वतः नुतनीकरण करून पाटबंधारे विभागाला जादा पाणी आकार (रेट) देऊन आपल्या कडे चालविण्यासाठी ठेवावीत, प्रमारक श्रेणी 2 व राज्य जेष्ठता असणाऱ्या तंत्रज्ञ यांचे पदोन्नती पॅनल लवकरात लवकर घेऊन वंचित कर्मचान्यांना न्याय द्यावा, विभागिय व मंडल सेवा जेष्ठतामध्ये येणान्या कर्मचान्यांचे वय ५० पूर्ण असल्यास पदोन्नती नाकारली तरी त्यांनी घेतलेल्या Go 74) उच्च पदाचा नाम काढून घेऊ नये अशी दि. 05/04/2008 च्या दुरुस्ती चिट्टीची व्याप्ती वाढवुन 2014 नंतर रुजु झालेल्या तंत्रज्ञ ज्यांची सेवा जेष्ठता राज्यस्तरीय आहे व जे तांत्रिक संवर्गातील कामगार पदोन्नती मुळे राज्य सेवा जेष्ठतेमध्ये आहेत असे प्रभारक श्रेणी 2 आणि प्रभारक श्रेणी १ यांना सुद्धा सामाविष्ठ करुन घ्यावे, महापारेषण कंपनीतील तांत्रिक कामगार अधिकारी, कर्मचारी वर्किंग नॉमर्स ठरविण्यात यावे, हॉट लाईन युनिटमधील कर्मचारी यांना देण्यात आलेला हॉट लाईन अलाउन्सचा फरक व इतर फायदे त्वरीत अदा करण्यात यावे.

अपंग कर्मचान्यांना शासन निर्णया प्रमाणे सोयी सवलती देण्यात याव्या अॅनाली कमिटीची बैठक आयोजित करण्यात यावी. एल.टी.सी. • मध्ये आई वडिलांचे नावे समाविष्ठ करण्यात यावे, तसेच सुधारीत दराचा लाभ कामगारांना देण्यात यावा, चतुर्थ श्रेणीतील कामगारांचे सॅप अकाऊंट निर्माण करणे बाबत आदी प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा शासन व प्रशासनाला निवेदनाव्दारे कळविण्यात आले आहे. तरी सुध्दा कामगाराचे प्रश्न मार्गी न लागल्याने तिन्ही कंपनीतील तांत्रिक कामगारामध्ये प्रचंड प्रमाणात आकोश निर्माण झाला असल्याने आजाद मैदान मुंबई येथे दि.24 ऑगष्ट 2022 रोजी एक दिवशीय आकोश धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये राज्यातिल तिन्ही कंपनीच्या तांत्रिक कामगारांनी मोठया संख्येनी सहभाग नोंदविला. प्रशासनाने तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास येणान्या काळामध्ये अधिक तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे,

उपाध्यक्ष बी. आर. पवार, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, राज्य सचिव आनंद जगताप, कोषाध्यक्ष गजानन अघन, मुख्य कार्यालय प्रतिनीची पारेषण विकम चव्हाण, किरण कन्हाळे, प्रकाश वाघ यांनी दिला आहे. यावेळी या आक्रोश आंदोलनात राज्यभरातून तांत्रिक कामगारांची उपस्थिती होती.

“तांत्रिक कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवू ” प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांचे आश्वासन आक्रोश आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल आझाद मैदानावर सुरु असलेल्या तांत्रिक कामगार युनियन 5059 यांच्या आक्रोश आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत चर्चेला बोलावले.

यावेळी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने व केंद्रीय उपाध्यक्ष बी आर पवार यांनी उर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्याशी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाविषयीं चर्चा केली. यावेळी प्रधान सचिव वाघमारे साहेबांनी सकारात्मक चर्चा केली. आणि सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या. आणि सर्व मागण्या बाबत सकारात्मक विचार करून सोडविण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: