Friday, October 18, 2024
Homeराज्यबाळापूर पातूर रस्त्यावर पिकअप दुचाकी ला धडक...

बाळापूर पातूर रस्त्यावर पिकअप दुचाकी ला धडक…

दोघे गँभिर, पेट्रोल पपंजवळ ची घटना

पातूर – निशांत गवई

पातूर पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव चांन्नी फाटा नजीक असलेल्या पेट्रोल पंप जवळ पिकअप ने दुचाकीस्वराला जबर धडक दिल्याने दोघे गँभिर जखमी झाल्याची घटना १३ जून मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव वरून पातूर कडे जात असलेल्या पिकअप मालवाहक एम एच २८ बीबी ३०४० नंबर च्या वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रमांक एम एच ३०डब्लू ७५४ च्या दुचाकीला जबर धडक लागल्याने त्या गाडीवरील दोघे जण गँभिर जखमी झाले होते.

जखमी झालेल्या दुचाकी गाडीवरील जखमींना नजीक असलेल्या वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किसन विठ्ठल लाखे ७५, रा मोरगाव साडीजन राम वासुदेव कवळकार वय२६ रा. खिरपुरी या दोघांना सुद्धा स्थानिक डॉक्टर यांनी प्राथमिक उपचार करून अकोला पाठविण्यात आले आहे.वृत्त लिहेपर्यत घटनेचा पंचनामा करण्यात आला नव्हता.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: