Tuesday, October 15, 2024
Homeमनोरंजनरोमन बॉय आलाय आपल्या भेटीला..!

रोमन बॉय आलाय आपल्या भेटीला..!

मुंबई – गणेश तळेकर

दि. ७ जून 2023 संध्याकाळी सहा वाजता मुंबई अंधेरीतील 99 STUDIO मध्ये 7merry Film Production च्या अंतर्गत “रोमन बाय ” ह्या video Album चे अनावरण करण्यात आले, सागर कोळी व तेजस्विनी कोळी निर्मित ह्या अल्बमचे अनावरण प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते राकेश बेदी ह्यांच्या हस्ते करण्यात आले, ह्यावेळी हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर निर्माते व दिग्दर्शक उपस्थित होते,

विजय पाटकर हे कसलेले अभिनेते अल्बमचे प्रमुख आकर्षण आहे. सागर कोळींना “रोमन बाय ” बद्दल विचारले असता, रोमन बाय नांवाची अतिशय सुंदर व देखणी बाई होती, अशी दंतकथा सांगीतली जाते, जिला बघायला पुरुषच काय पण स्रीयाही खिडकीतून डोकावून दर्शन घ्यायच्या!

अर्नाळा गांवातील निसर्गरम्य अश्या सुंदर समुद्र किनारी व भरलेल्या बाजारपेठेत शूट करतांना भरपूर अडचणी आल्या असतांना सुद्धा सर्व कलाकार व टेक्नीकल टिमने मेहनत, कष्ट घेवून ,हा अतिशय सुंदर असा ” रोमन बाय ” आपल्या भेटीस आणला आहे! निर्माता: सागर कोळी

सह निर्माती : तेजस्विनी कोळी
मुख्य कलाकार : विजय पाटकर, दिव्या शिंगाडिया
दिग्दर्शकः पराग सावंत

संगित दिग्दर्शक : कबिर शाक्य
नृत्यदिग्दर्शक : नॉडी रसल
कॅमेराःदिलीप गंगोडे

प्रॉडक्शन हेडः हॅरी मल्या
कॉस्टींग डायरेक्टर :निलेश कर्णिक
ग्रॉफीक्स आणि डि . आय . साधन भोईर
ई.पी : करिश्मा अडे

प्रॉडक्शन मॅनेजर : गिरीश माळकर निर्माता म्हणून त्यांना अजून बरेच प्रोजेक्ट करायचे आहेत, एक कोळी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट, हिंदी मालीका, वेबसिरीज व अनेक मोठमोठे आकर्षण आहेत. आमच्या समूहातर्फे हार्दिक शुभेच्छा!

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: