Viral Video : सोशल मिडीयावर असे विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात आणि काही ऐकली जातात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. अशा अनेक घटना आहेत, ज्या प्रथमदर्शनी चमत्कारापेक्षा कमी वाटत नाहीत. त्याचबरोबर काही घटनांनी माणूस हादरून जातो.
अशीच एक घटना आजकाल सोशल मीडियावर लोकांच्या हादरवून सोडत आहे. मृत झालेली महिला ज्यामध्ये शवपेटीमध्ये होती तीच महिला जिवंत झाली आणि ती शवपेटी ठोठावत ती उघडण्यास सांगू लागली.
वास्तविक, एका महिलेला मृत समजून तिला अंत्यसंस्कारासाठी नेले जात होते, परंतु नंतर ती महिला मृत्यूच्या झोपेतून जागी झाली आणि तिने शवपेटी ठोठावण्यास सुरुवात केली आणि ती उघडण्यास सांगितले. हे धक्कादायक प्रकरण इक्वेडोरमधील बाबाहोयो शहरातले आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, गेल्या शुक्रवारी 76 वर्षीय बेला मोंटोया यांना मेंदूचा झटका आल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. एवढेच नाही तर महिलेचे मृत्यू प्रमाणपत्रही जारी करण्यात आले.
नातेवाईक तिला शवपेटीत घेऊन घरी नेले तेव्हा वृद्ध महिलेचा श्वासोच्छवास सुरू झाला. शवपेटीमध्ये वृद्ध महिलेला श्वास घेताना पाहून तेथे उपस्थित लोक थक्क झाले. सध्या वृद्ध महिलेला उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.
बीबीसीच्या वृत्तानुसार, इक्वाडोरच्या आरोग्य मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की महिलेला हृदयविकाराचा झटका आला होता.
तिचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. तपासणीनंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी वृद्ध महिलेला मृत घोषित केले. सध्या या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तपासात जो दोषी आढळेल त्याला शिक्षा होईल.
या संपूर्ण प्रकरणामध्ये बेला मॉन्टाया यांचा मुलगा गिल्बर्ट बालबर्न याने स्थानिक मीडियाला सांगितले की, त्याच्या आईला सकाळी ९ वाजता दाखल करण्यात आले आणि दुपारी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
🇪🇨 | LO ÚLTIMO: ¡Aunque usted no lo crea!
— Alerta Mundial (@AlertaMundial2) June 10, 2023
Una mujer que fue declarada muerta por un médico, revivió en pleno sepelio ante la mirada de sus familiares, inmediatamente fue trasladado al hospital Martin Icaza donde la volvieron a atender, ocurrió en Babahoyo, Ecuador. pic.twitter.com/nYn0o5jDab
तिला अनेक तास शवपेटीमध्ये ठेवण्यात आले. आम्ही घरी शवपेटी उघडली तेव्हा ती श्वास घेत होती, त्यानंतर आम्ही विलंब न करता तिला रुग्णालयात नेले. माझी आई मेली नव्हती, त्यानंतरही तिच्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले.