Friday, September 20, 2024
Homeराज्यराजेंद्र मुळक सहायता कक्ष आपल्या दारी...

राजेंद्र मुळक सहायता कक्ष आपल्या दारी…

रामटेक – राजु कापसे

कन्हान नगर परिषद अंतर्गत सिहोरा गाव, प्रभाग क्र. 3, तह. पारशिवणी येथे दिनांक 08/06/2023 रोज गुरूवार ला मा.श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षापासून राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमातून गाव व शहरातील गरजू लोकांचा जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा या करीता,

सिहोरा गाव येथे राशन कार्ड, मतदान कार्ड , आधार अपडेट, निराधार योजना नोंदणी, ई श्रम कार्ड, इमारती बांधकाम इत्यादी विषयांवर उपाय योजना करण्याकरीता राजेंद्र मुळक सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.

यावेळी श्री. राजेशजी यादव (अध्यक्ष, कन्हान शहर काँग्रेस कमिटी), श्री. आकिबजी सिद्दीकी (अध्यक्ष, कन्हान शहर युवक काँग्रेस), श्री. अजयजी कापसिकर, श्री. बाबुरावजी बावणे, श्री. मारोतीजी गोंडाने, श्री. संतोष ठकरेले,

श्री. आकाश ठकरेले, श्री. प्रज्वल वारके, श्री. सागर हुमने, श्री. शैलेश लिल्हारे, श्री. रोशन बावणे, श्री. शुभम बावणे इत्यादी मान्यवर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: