नांदेड – महेंद्र गायकवाड
देशात भाजप आणि संघ परिवाराकडून ज्या पद्धतीने दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. सामाजिक दुही मजविण्याचे काम सुरू आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरेवापर केला जात आहे. या परिस्थीतीत संघ आणि भाजपला अद्दल घडविण्याची आणि भाजपला संपविण्याचा वेळ आली आहे आणि ही ताकत केवळ शिवसेनेत आहे असे मत शेतकरी सेनेचे संघटक अनंत चोंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी बीडचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सह संपर्क प्रमुख प्रकाश मारावार, युवा सेना सह सचिव माधव पावडे, शहर प्रमुख सचिन किसवे, राजू मोरे, गणेश शिंदे, बळवंत तेलंग, शैलेंद्र रावत, किशन फाटले,युवती सेना उत्तर प्रमुख रोहिणी कुलकर्णी, दक्षिण प्रमुख प्रियंका कुंभार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना चौंदे म्हणाले की, देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी काम केले. राज्य उत्तम रित्या चालले. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी गद्दरानी दगा दिला.मात्र शिवसैनिकांनी घाबरण्याचे कारण नाही. शेतीत खळ्यात रासकाढल्यावर जे मात्र असते त्या मात्र नाव देण्याच्या लायकीचेही हे गद्दार लोक नाहीत. शिवसेनेशी गद्दार झालेले मात्र नावालाही शोभत नाहीत. चाळीस आमदार , बारा खासदार निघून गेलेत याचा अर्थ आपण संपलो नाही तर ती पानगळ आहे.
साचलेले पाणी भाजपाच्या रूपाने बाहेर गेलीत.आता नव्या झऱ्याना संधी मिळाली आहे. शिव शब्द आपल्या जवळ आहे.शिवसेना आपल्या सोबत आहे.या राज्याचा शेतकरी आपल्या सोबत आहे त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. हे इडीच सरकार आहे त्याची आपल्याला भीती नाही.शिवसैनिक या इडीच वेड काढतील. भाजप आणि संघ संपयाच असेल तर प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी पुन्हा रुजवावी लागेल.
संघाची विचारसरणी उघडून काढायचं असेल तर प्रबोधनकारांच्या विचाराचा दांडा आणि झेंडा आपण मजबूत पणे सांभाळावा लागेल. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती करू शकलो भविष्यात वांचीतला सोबत कसे घ्यायचे हे काम सुरू आहे. ते होत राहील परंतु त्यासोबत शेतकरी सेना मजबूत करायची आहे. शेतकरयांना आपल्या सोबत जोडायची आहे. महाराष्ट्रात क्रांती होणारच आहे. शेड्युल टेन नुसार गद्दार आमदार अपात्र होतीलच.
शिवाय जनता त्यांना कायमची अपात्र करतील. तोपर्यंत आपण आपल्या गावातील शेतकरी सेना मजबूत करावी. गाव पातळीपासून शेतकरी सेना बांधणी करूया. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान सचिन किसवे, माधव पावडे, प्रकाश मारावार, दत्ता पाटील कोकाटे, बीडचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची समयोचीत मनोगते झाली.